उल्हास नदीला येत्या पाच वर्षात येईल वालधुनीचे स्वरूप

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2020
Total Views |
ulhas nadi _1   
 
 
 
 
कल्याण : उल्हास नदी ही ठाणे जिल्ह्यातील ५० लाख नागरिकांची तहान भागवत आहे. सध्या ती स्वच्छ दिसत असली तरी येत्या पाच वर्षात तिचे स्वरूप वालधूनी नदीसारखी होण्याची शक्यता असल्याचा दावा नदी बचावसाठी काम करणा:या कार्यकत्र्यानी केला आहे. उल्हास नदीवर प्रदूषणामुळे जलपर्णीची चादर पसरली आहे. जलपर्णी नदीतील पाणी शोषित असून ती आरोग्याला हानीकारक आहे. मात्र या प्रदूषणाकडे सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष होत असताना दिसून येत आहे.
 
 
 
कजर्त, नेरळ, माथेरान, वांगणी, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण या शहरातून पेज नदी, बारवी नदी, भातसा नदी, शिलाहार नदी, काळू नदी, वालधुनी नदी ह्या उपनद्यांना जोडून १२ महिने वाहणारी उल्हास नदी आहे. ही नदी आज स्वच्छ दिसत आहे. उल्हास नदीमध्ये कजर्त ५० एमएलडी, नेरळ-माथेरान ५०  एमएलडी, कुळगाव-बदलापूर नगरपालिका ६० एमएलडी, उल्हासनगर मनपा ९० एमएलडी, कल्याण-डोंबिवली मनपा २१५  एमएलडी, भिवंडी मनपा यांच्याकडून ११० एमएलडी प्रक्रिया न करता नदीत सोडण्यात येते. मोठय़ा नाल्यातून लाखो लीटर मलमूत्र व एमआईडीसीमधून ३४ एमएलडी रासायनिक केमिकल मिळून दररोज 600 एमएलडी सिवेज व रसायन प्रक्रिया न करता सोडल्यामुळे उल्हास नदीला येत्या पाच वर्षात वालधुनी नदी स्वरूप येईल.
 
 
 
एक एमएलडी म्हणजे १० लाख लीटर होते. त्याप्रमाणो उल्हास नदीत मोठय़ा प्रमाणावर जलप्रदूषण होते आहे. सर्व शहरातील मोठे नाले, अनेक छोटे नाले, कारखान्यामधील घातक केमिकल हे नदीमध्ये मिसळून जलप्रदूषण मोठय़ा प्रमाणावर होत आहे. या प्रदूषणाकडे सरकारी यंत्रणोकडून दुर्लक्ष होत आहे. नदी प्रदूषण प्रकरणी सर्वाच्च न्यायलयाकडून दंडआकारण्यात आला आहे. तरी देखील प्रदूषण थांबलेले नाही. कोरोना काळात कारखाने बंद होते. त्यामुळे उल्हास नदीवर जलपर्णीचे प्रमाण कमी दिसून येत होते. अनलॉकनंतर कारखाने सुरू झाल्यावर प्रदूषण वाढल्याने मोठय़ा प्रमाणावर जलपर्णी दिसत आहे.
 
 
 
 
उल्हास नदी प्रदूषण रोखण्यासाठी २०१३ पासून वनशक्ती या पर्यावरण संस्थेकडून लढा सुरू आहे. या संस्थेची याचिका हरीत लवादाकडे न्यायप्रविष्ट आहे. कोरोनामुळे मार्च महिन्यापासून त्यावर आजर्पयत सुनावणी झाली नाही. उल्हास वालधुनी जल बिरादरी आणि उल्हास नदी बचाव समिती यांच्याकडून वारंवार उल्हास नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न विविध ठिकाणी उपस्थित केला जात आहे. 
@@AUTHORINFO_V1@@