परदेशातून आलेल्या प्रवाशांचे पालिका करणार असे 'स्वागत'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2020
Total Views |
Covid 19_1  H x
 


परदेशी प्रवाशांसाठी पालिकेची नियमावली


मुंबई : इंग्लंडसह परदेशातून आलेल्या प्रवाशांना मुंबईत क्वारंटाईन करण्यात आले असले तरी चाचणी निटेटिव्ह आल्यानंतर इंग्लंड वगळता इतर देशांच्या प्रवाशांना सात दिवसांतर घरी क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. मुंबई महापालिकेने याबाबत नवी नियमावली जारी केली आहे.



इंग्लंडसह काही देशांमध्ये कोरोनाचा नवा विषाणू सापडल्याच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडमधून येणार्‍या विमानांना भारतात ५ जानेवारीपर्यंत बंदी आहे. त्यामुळे इंग्लंड सोडून इतर देशांतून येणार्‍या प्रवाशांना आता हा नियम पाळावा लागणार आहे. जगभरात २०२० सालापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला आणि आता हे वर्ष संपायला आले आहे. वर्षाच्या अखेरीला अनेक देशांमध्ये कोरोना नियंत्रणात आला आहे.
 
 
 
त्याचबरोबर कोरोनावर जगभरात अनेक लसींची निर्मिती झाली असून त्या देणेही सुरू झाले आहे. मात्र, त्याचवेळी इंग्लंड, फ्रान्स आणि दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा विषाणू सापडल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतासह जगाने इंग्लंडमधील विमानसेवेवर बंदी घातली आहे. भारतानेही इंग्लंडमधील विमानसेवेवर बंदी घातली आहे. त्याचबरोबर खबरदारीचा उपाय म्हणून जगभरातून येणार्‍या प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
 
 
 
पाचव्या दिवसापासून कोरोना चाचणी
 
 
मुंबई महापालिकेने सुधारित नियमावली जाहीर केली असून यात परदेशातून मुंबईत येणार्‍या प्रत्येक प्रवाशाला सात दिवस हॉटेलमध्ये स्व खर्चाने क्वारंटाईन होणे, कोरोना चाचणी करणे बंधनकारक केले आहे. हॉटेलमध्ये क्वारंटाईन केल्यानंतर पाचव्या, सहाव्या किंवा सातव्या दिवशी या प्रवाशांची कोरोनासाठी आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. यात प्रवासी निगेटिव्ह आढळल्यावर त्याला पुन्हा घरी सात दिवसांसाठी क्वारंटाईन राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
 
 
रुग्णांसाठी २०० बेड सज्ज
 
पॉझिटिव्ह आढळणार्‍या व्यक्तीला सेव्हन हिल्स आणि जी. टी. रुग्णालयात तयार केलेल्या प्रत्येकी १०० बेडच्या स्वतंत्र कक्षात उपचार केले जाणार आहेत. इंग्लंडमधून आलेल्या प्रवाशांसाठी सेव्हन हिल्समध्ये उपचार केले जाणार आहेत तर इंग्लंड सोडून इतर देशांतून आलेल्या कोरोना रुग्णांवर जी. टी. रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. मात्र, परराष्ट्र खाते आणि उच्चायुक्तांमध्ये काम करणार्‍या कर्मचारी-अधिकार्‍यांना हे नियम लागू नसून त्यांना यातून वगळण्यात आले आहे, असे प्रशासनातर्फे जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.





@@AUTHORINFO_V1@@