'आयसीसीआर'च्या अध्यक्षपदी फेरनियुक्तीबद्दल डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांचे अभिनंदन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Dec-2020
Total Views |
MTB_1  H x W: 0
 
 
 
 
मुंबई : ‘भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदे’च्या (आयसीसीआर) अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आल्याबद्दल भाजपचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे सोमवार, दि. २८ डिसेंबर रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर आणि व्यवसाय प्रमुख रविराज बावडेकर उपस्थित होते.


तसेच डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी मुंबई स्थित पॉलिसी अडवोकॅसी रिसर्च सेंटर-पार्कच्या कार्यालयास भेट दिली. पार्क येथील संशोधन प्रकल्प समन्वयक रुचिता राणे यांनी तेथे चालणाऱ्या प्रकल्पांविषयी माहिती दिली. यावेळी विविध विषयांवर अभ्यास करणाऱ्यांमध्ये बनिशा शेख, निकेता शर्मा, आदित्य देशपांडे, नितीन फुगे, सोमेश कोलगे व पौरस सरमळकर हे देखील उपस्थित होते.



@@AUTHORINFO_V1@@