कोविड रुग्णालय घोटाळयाचे मातोश्री कनेक्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2020
Total Views |

Kirit Somaiya_1 &nbs
 
 

ठाण्यात सातपैकी तीनच रुग्णालये सुरू - ठाकरे सरकारचा ५ हजार कोटींचा घोटाळा

 
 
ठाणे : कल्याण- डोंबिवलीनंतर ठाण्यातही कोविड रूग्णालय उभारणीत घोटाळा झाला आहे. ठाण्यातील सातपैकी तीनच रुग्णालये सुरू असुन केवळ कंत्राटदारांसाठी उभारलेल्या या कंत्राटांचे मातोश्रीशी कनेक्शन असल्याचा आरोप भाजप नेते माजी खा. किरीट सोमय्या यांनी करून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.कोविड काळात ठाकरे सरकारने महाराष्ट्रात ५ हजार कोटींचा घोटाळा केला आहे. तेव्हा, या सर्व व्यवहारांची काळी पत्रिका भाजप काढणार असल्याचे सोमय्या यांनी जाहीर केले.दरम्यान,आ.प्रताप सरनाईक प्रकरणावर बोलताना एका घोटाळ्यात भुजबळ तीन वर्ष तुरुंगात होते, आता घोटाळेबाज सरनाईक किती वर्षासाठी जातात,हे बहुया असा टोलाही सोमय्यांनी लगावला.
 
 
 
 
 
 
कोरोना रुग्णांवर वेळीच योग्य उपचार व्हावेत.यासाठी ठाणे महापालिकेने एकुण सात कोविड सेंटर उभारली असून यातील व्होल्टास, बोरिवडे आणि बाळकुम येथील ग्लोबल हॉस्पिटल ही तीनच रुग्णालये सुरू आहेत.या रुग्णालयांची क्षमता १ हजार ८७५ असताना रुग्णसंख्या मात्र, अवघी २५२ आहे. या तीन कोविड सेंटरची पाहणी रविवारी दुपारी सोमय्या आणि आमदार निरंजन डावखरे यांनी केली. यावेळी भाजप गटनेते संजय वाघुले, नगरसेवक मनोहर डुंबरे व महापालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित होते. यावेळी सोमय्या यांनी, सध्या ठाण्यात १ हजार ६२० बेड रिकामे असताना आणखी ३ हजार १४४ बेडची हॉस्पिटले उभारली जात असुन ठाण्यातील या कोविड सेंटरच्या घोटाळ्याचे थेट कनेक्शन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्री बंगल्यावरून आपल्या पसंतीच्या कॉन्ट्रॅक्टरला ५२ कोटीचे कंत्राट बक्षीस म्हणून दिले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
 
 
ठाण्यात उभारलेल्या ७ हॉस्पिटल व सेंटरच्या व्यवस्थापनाची कंत्राटे चेंबूर येथील एकाच कंपनीला मिळाली असून या कंपनीसोबत केलेल्या करारात रुग्ण नसतानाही २५ टक्के रक्कम देण्याची हमी देण्यात आली.त्यामुळे काम न करताही कंत्राटदार गब्बर होणार.असे चमत्कार केवळ ठाणे महापालिका व महाविकास आघाडी सरकारच करू शकते,असा टोला सोमय्या व डावखरे यांनी लगावला.तेव्हा,या कंत्राटदाराचे फायनान्शियल व मेडिकल ऑडिट करावे. प्रत्यक्ष वैद्यकिय उपचाराचा अनुभव नसून केवळ मेडिक्लेमचा अनुभव असलेल्या एका बीएएमएस डॉक्टरला संबंधित संस्थेने प्रमुख म्हणून नेमले आहे.ठाणे महापालिकेने मोठ्या पगाराची जाहिरात देऊनही डॉक्टर उपलब्ध झाले नव्हते.मात्र, या कंपनीला डॉक्टरसह सर्व कर्मचारी उपलब्ध झाले, हा प्रकार आश्चर्यजनक असल्याकडे डावखरे यांनी लक्ष वेधले.
 
 
कोविडचा 'आजार' कंत्राटदारांसाठी 'बाजार'
 
 
ठाणे महापालिकेच्या बाळकूम, कळवा आणि मुंब्रा येथील हॉस्पिटलच्या बेडची क्षमता १ हजार ८७५ असून, तेथे अवघे २५२ रुग्ण दाखल आहेत. सध्या १ हजार ६२० जागा रिक्त आहेत. बुश कंपनीतील ४४० व बोरिवडे येथील ३०४ रुग्णक्षमतेचे केंद्र उद्घाटनानंतर रुग्ण नसल्याने सुरू झालेच नाही. तर ज्युपीटर हॉस्पिटलनजीकच्या पार्किंग प्लाझामधील १ हजार ३०० बेडचे हॉस्पिटल तयार झाले आहे. मात्र, व्होल्टासच्या जागेवरील आणखी १००४ बेडच्या रुग्णालयाचे काम सुरू करण्यात आले आहे. महापालिकेच्या हॉस्पिटलबरोबरच खासगी हॉस्पिटलमध्येही बेड रिकामे आहेत. सध्याच्याच हॉस्पिटलमध्ये क्षमतेएवढे रुग्ण नसताना नव्या हॉस्पिटलचा घाट केवळ कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी नोव्हेंबर महिन्यातच घातला असुन या माध्यमातून कोट्यवधीची लूट केली जात आहे,याकडे सोमय्या व डावखरे यांनी लक्ष वेधले.तीन दिवसांपुर्वी प्रादुर्भाव झालेल्या नव्या कोरोना स्ट्रेनसाठी उपाययोजना असल्याच्या थापा उद्धव ठाकरे व संजय राऊत मारत आहेत.कोरोना आपत्तीच्या काळात ठाकरे सरकारने महाराष्ट्रात सुमारे ५ हजार कोटींचा घोटाळा केला असून यावर भाजपातर्फे लवकरच काळी पत्रिका काढणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले.
 
 
रुग्णालयाच्या तंबूचे मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन : निरंजन डावखरे
 
 
झी उद्योगसमूहाकडून बोरिवडे येथे कोविड सेंटर उभारले असून, तेथील वैद्यकियसह सर्व सुविधा महापालिकेकडून पुरविल्या जाणार आहेत. सद्यस्थितीत या ठिकाणी कोणतीही वैद्यकीय व्यवस्था सुरू केली नसून, एकाही वैद्यकिय कर्मचाऱ्याची नियुक्ती केली नसल्याचे दौऱ्यात आढळले. त्यामुळे बोरिवडे येथील कोविड सेंटरच्या तंबूचेच उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.अशी खिल्ली आ. निरंजन डावखरे यांनी उडवली.
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@