उत्तर-पूर्व भारतात तुफान बर्फवृष्टी :पर्यटकांना फटका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2020
Total Views |

1_1  H x W: 0 x
 
 


अमृतसरमध्ये दोन विमानांच्या फेऱ्या रद्द


नवी दिल्ली : हिवाळा सुरू झाल्यापासून उत्तरेकडील तापमानात घट होताना काही दिसत नाही. रविवारी उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडली आहे. हिमाचलमध्ये दोन दिवस बर्फवृष्टी आणि पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये किन्नौर, लाहौल-स्पीति आणि चंबा घाटी येथे ४८ तासांत बर्फवृष्टी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगडमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 
 
 
 
शनिवारी अमृतसरमध्ये पसरलेल्या धुरक्यामुळे सहा विमाने उशीराने रवाना झाली तर दोन विमाने रद्द करण्यात आली. हवामान विभागातर्फे या राज्यांमध्ये २९ डिसेंबरपर्यंत शीतलहरीचा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे राजस्थानातील सहा शहरांचा पारा पाच अंस सेल्सिअंशने घसरला आहे. पाटणासह पूर्ण बिहारचा पारा घसरला १० अंशांने घसरला आहे.
 
 
 
राजस्थानात कडाक्याची थंडी
 
 
राजस्थानमध्ये आता थंडीचा पारा घसरू लागला आहे. एक ते दो अंशसेल्सिअंशपर्यंत पारा घसरू लागला आहे. शनिवारी रात्री राजस्थानच्या सहा शहरांमध्ये तापमान पाच अंश सेल्सिअंशने घसरला आहे. ढगाळ वातावरणामुळे पारा १८ ते २० डिग्री अंश सेल्सिअंशपर्यंत असणार आहे. फतेहपूर १.४ अंश सेल्सिअंश तापमान नोंदवल्यानंतर राजस्थानातील सर्वात थंड ठिकाण नोंदवले गेले. जयपुरमध्ये पारा ८.४ अंशसेल्सिअंशने घसरला आहे. हवामान विभागाने येथेही तीन ते पाच डिग्री अंश सेल्सिअंश इतके तापमान घसरण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
 
 
 
 
 
 
हरियाणात हिवसाळा
 
 
पंचकूला, यमुनानगर, अंबाला, कुरुक्षेत्र, करनाल आदी जिल्ह्यांमध्ये रविवार, सोमवारी हलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या जिल्ह्यात काही ठिकाणी शुक्रवारपासून ढग दाटून आले होते.
 
 

बिहारमध्ये गया येथे रेकॉर्डब्रेक थंडी
 
 
पाटणासह संपूर्ण बिहारमध्ये तापमान १० अंशसेल्सिअस पारा घसरला आहे. थंडीपासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाच्या मते, डोंगराळ भागात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे मैदानी भागांमध्ये कडाक्याची थंडी पडणार आहे. शनिवारी पाटण्याचे किमान तापमान ८.३ अंशसेल्सिअश इतके होते. सर्वसामान्य तापमानापासून ते १.२ अंशांनी घसरले.
 
 
 
झारखंड साधारण परिस्थिती
 
 
रांची सह झारखंडमध्ये बहुतांश जिल्ह्यात १ जानेवारीपर्यंत किमान तापमान १०-१२ ते कमाल २५-२६ इतके असणार आहे. शनिवारी राजधानी रांचीचे कमाल तापमान २५.४ अंश सेल्सिअंश नोंदवण्यात आले आहे. इथे किमान तापमान ९.७ अंश सेल्सिअंश नोंदवण्यात आले आहे. शुक्रवारी ते शनिवारपर्यंत कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे.
 
 
 
पंजाबमध्ये धुके
 
 
हवामान विभागातर्फे पंजाबमध्ये सोमवारपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बहुतांश भागांमध्ये धुक्याची चादर पसरली आहे. नव्या वर्षाच्या स्वागतापर्यंत हीच अवस्था राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पठाणकोट, गुरदासपुर आणि रोपड भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. इथे किमान तापमान २.५ अंश तर पठाणकोटमध्ये पारा ३.५, हलवारामध्ये ३.७ आणि बठींडामध्ये ३.८ अंशांपर्यंत घसरला आहे.
 
 
 
 
केलांगमध्ये उणे ११ पारा
 
 
हिमाचलच्या लाहौल स्पीति भागात मोठी बर्फवृष्टी झाली. पर्यटकांची यामुळे घोर निराशा झाली होती. अटल टलनच्या एका मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हिमाचलमध्ये ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. सध्या राज्यातील केलांगचा पारा ११.१० अंशासह सर्वात कमी नोंवदवण्यात आला आहे.
 
 
 
 
 
 
अरुणाचलमध्ये हवेचा वेग ताशी ९० किमी
 
अरुणाचल प्रदेशच्या कित्येक भागात पारा उणे १० अंश सेल्सिअंशने घसरला आहे. तिथे ८० ते ९० किमी प्रतिताशी वारा वेगाने वाहत आहे. डोंगराल भागात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत आहे.
 
 
 
 

भारतीय जवानांना कडक सॅल्युट
 
 
LAC भागात अशा ठिकाणी जवान तैनात आहेत जिथे मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत असते. तिथे वाहनांद्वारे पोहोचणेही कठीण होऊन जाते. १५ हजार ५०० फूट उंचावर याक आणि खेचराच्या सहाय्याने आवश्यक सामग्री पोहोचवली जात आहे.
 
 
 
चंदीगडमध्ये पारा घसरणार
 
 
चंडीगडमध्ये रविवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पावसाचाही अंदाज व्यक्त केला जात आहे. हवामान विभागातर्फे तापमान आणखी घसरणार आहे तसेच थंडीही वाढणार आहे. इथे शनिवारी चार अंश सेल्सिअंशपर्यंत पारा पोहोचला होता.
 
 
मुंबईसह राज्याचा पारा घसरणार
 
 
मुंबईत आणि राज्यात थंडीचा जोर गेल्या काही दिवसांपासून कायम होता. मात्र, आता थंडी ओसरली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, डिसेंबरअखेर पुन्हा थंडीच्या लाटेचा अनुभव घेता येणार आहे. २८ डिसेंबरनंतर उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तापमानात घट होईल, अशी शक्यता आहे. दक्षिणेकडील वाऱ्यांमुळे मुंबईच्या तापमानात किमान वाढ होईल. येत्या काळात राज्यात आणखी काही दिवस गारवा अनुभवता येईल, असा अंदाज आहे.

@@AUTHORINFO_V1@@