रा.स्व. संघ पोहोचविणार लोकांर्पयत श्रीराम मंदिराचा इतिहास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2020
Total Views |

RSS kalyan_1  H
 
 
डोंबिवली : अयोध्यातील श्रीराम मंदिर उभारणीचा जाज्वल्य इतिहास लोकांर्पयत पोहोचावा याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कल्याण जिल्ह्याने कंबर कसली आहे. रा. स्व. संघातर्फे निधी संकलन अभियान राबविण्यात येणार आहे. कल्याण तालुक्यातील हजारो स्वयंसेवक त्यासाठी कामाला लागले आहेत. अयोध्यातील श्रीराम मंदिराची वास्तू उभारणीसाठीच्या दीड हजार कोटी रूपयांच्या खर्चापैकी खारीचा वाटा म्हणून रा. स्व. संघ कल्याणच्या वतीने निधी संकलन अभियान राबविण्यात येणार आहे.
 
 
 
यासाठी संघ स्वयंसेवकांसह परिवारातील विविध संस्था, संघटनांना योगदान करण्यासाठी आवाहान करण्यात आले आहे. कल्याण जिल्ह्यात १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी या कालवधीत निधी संकलन अभियान राबविण्यात येणार आहे. कल्याणच्या ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात हे अभियान होणार आहे. श्रीराम मंदिर तिथक्षेत्र ट्रस्टचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन निधी संकलन करणार आहेत. यासाठी प्रत्येक कुटुंबाने अंदाजे शंभर रूपयांचे कुपन फाडावे अशी अपेक्षा आहे. त्या कुटुंबाला सोबतच मंदिराबाबतची माहितीपत्रक दिले जाणार आहे.
 
 
 
श्रीराम मंदिराचा जाज्वल्य इतिहास लोकांर्पयत पोहचावा हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे निधी संकलनात प्रत्येक कुटुंब स्वेच्छाने रक्कम देऊ शकतात. निधी संकलनातून किती रक्कम जमा होईल हे निश्चित पणो सांगणो कठीण आहे. पण कल्याण तालुक्यातील किमान पाच लाख लोकांर्पयत पोहोण्याचा मानस असल्याची माहिती अभियान प्रमुख रोशन जगताप यांनी दिली आहे. नागरिकांनी राम मंदिरासाठी सढळ हस्ते मदक करावी असे आवाहान अभियान सहप्रमुख संतोष हिंदळेकर यांनी केले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@