सिंडी उर्फ शेरील बेन तोव्ह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Dec-2020
Total Views |

Article on Cindy aka Sher
 
 
 
ब्रिटनच्या तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांना दुखावणे इस्रायलला परवडणारे नव्हते आणि एक दिवस व्हेनुनूची भेट सिंडी नामक एका अमेरिकन प्रवासीशी झाली. ती एक अमेरिकन प्रशिक्षणार्थी ब्युटिशियन म्हणून व्हेनुनूला भेटली. मुळातच स्त्रीलंपट असणारा व्हेनुनू स्मार्ट आणि आकर्षक सिंडीच्या जाळ्यात फसायला वेळ लागणार नव्हताच! कोणत्याही परिस्थितीत ब्रिटनबाहेर न जाण्याची वर्तमानपत्राने दिलेली तंबी विसरून सिंडीच्या गोड बोलण्यात फसून व्हेनुनू तिच्याबरोबर ‘सुट्टी घालविण्यासाठी’ रोममध्ये दाखल झाला. रोममध्ये उतरल्यावर सिंडीने त्याला शहरातील एका जुन्या घरात नेले, जिथे तीन ‘मोसाद’ एजंट्स त्यांची वाटच पाहत होते. तत्काळ व्हेनुनूला पॅरालाइझ्ड करण्याचे इंजेक्शन दिले. त्यानंतर त्याच रात्री ‘लास्पेझिया’ या बंदरावरून ‘नोगा’ या बोटीने त्याला इस्रायलला नेण्यात आले. सिंडीची कामगिरी यशस्वी झाली.
 
 
आपल्याला कोणीही कधी पकडू शकेल, असं जॉन क्रॉसमनला कधीही स्वप्नातसुद्धा वाटलेलं नव्हतं! कारण? कारण तो ब्रिटनमध्ये होता!
 
जॉन क्रॉसमन किंवा मोर्देची व्हेनुनूचा जन्म १४ ऑक्टोबर, १९५२ रोजी मार्केश-मोरोक्को येथे एका अतिशय पुराणमतवादी ज्यू कुटुंबात झाला. त्याचे वडील शालोम यांचे किराणा मालाचे दुकान होते, तर आई माझाल गृहिणी होती. ऑक्टोबर १९७१ मध्ये आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर, त्याला लष्करात भरती होणे अनिवार्य होते. त्याप्रमाणे इस्रायली डिफेन्स सर्व्हिसमध्ये कॉम्बॅट इंजिनियरिंग कॉर्प्समध्ये तो रुजू झाला. १९७३च्या योम किप्पूर युद्धामध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. या युद्धानंतर त्याला लष्कराने कायमस्वरूपी पद देऊ केले. मात्र, त्याने ते नाकारल्यानंतर १९७४ मध्ये सन्मानपूर्वक तो लष्करातून निवृत्त झाला. त्यानंतर १९७६ मध्ये नेगेव्ह येथील नेगेव्ह विद्यापीठात अणुसंशोधन केंद्रामध्ये (र्पीलश्रशरी ीशीशरीलह लशपींशी) अर्ज केला. तिथले प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तो र्पीलश्रशरी श्रिरपीं तंत्रज्ञ म्हणून कामावर रुजू झाला. या दरम्यानच्या काळातच सुरुवातीला उजव्या आणि राष्ट्रवादी विचारसरणीचा व्हेनुनू हळूहळू डाव्या विचारसरणीकडे झुकू लागला. १९८५ मध्ये त्याने आपली नोकरी सोडली, आणि इस्रायलमधील कम्युनिस्ट पक्षाच्या बैठकांनादेखील हजर राहण्यास सुरुवात केली. याचदरम्यान ज्यूडी नावाची एक नर्स आणि तिच्या बहिणीबरोबर इस्रायलच्या आसपासच्या प्रवासावर व्हेनुनू गेला. त्यानंतर जानेवारी १९८६ मध्ये जग फिरण्याच्या कल्पनेने त्याने इस्रायल सोडून अतिपूर्वेला जाण्याचे ठरविले आणि हायफा येथून बोटीने अथेन्स, ग्रीसला पोहोचला. तिथून पुढे बँकॉक, मॉस्को, म्यानमार, नेपाळ असा फिरत फिरत सिडनी-ऑस्ट्रेलिया येथे दाखल झाला. सिडनीच्या प्रेमात पडून त्याने तिथेच स्थायिक व्हायचे निश्चित केले आणि त्यादृष्टीने हात-पाय मारायला सुरुवात केली. जुलै १९८६ मध्ये त्याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला आणि ड्रायव्हर म्हणून लायसन्स मिळविले. याचदरम्यान, कोलंबियातील मुक्त पत्रकार ऑस्कर गुरेरो याच्याशी त्याची भेट आणि ओळख झाली.
 
वर्षानुवर्षे इस्रायलने जगापासून लपवून ठेवलेली आण्विक शस्त्रांबाबतची व्हेनुनूकडे असणारी इत्थंभूत माहिती त्याला अमाप पैसा मिळवून देणारी ठरू शकते, ही कल्पना गुरेरोनेच त्याच्या डोक्यात भरवली आणि त्यानेच लगेच ‘संडे टाईम्स’ या ब्रिटिश पेपरशी संपर्क साधून व्हेनुनूच्या मुलाखतीसाठीची वेळही निश्चित केली. लगेच काही दिवसांच्या आतच पीटर होनुम नावाच्या एका पत्रकाराने त्याची मुलाखत घेतली. यानंतर एका अमेरिकन वर्तमानपत्राच्या म्हणण्यानुसार - स्वत: गुरेरोच इस्रायली दूतावासात जाऊन भेटला. ‘एका इस्रायली फितुराला’ पकडून देण्याच्या बदल्यात त्याला मोठ्या अर्थप्राप्तीची अपेक्षा होतीच. मात्र, अविक्लिमन नावाच्या इंटेलिजन्स ऑफिसरने त्यच्यावर विश्वास न ठेवता फक्त व्हेनुनूचा पासपोर्ट नंबर आणि नाव लिहून घेतले. त्यानंतर व्हेनुनूच्या मोठ्या भावाच्या बेरशेबा येथील दुकानात जाऊन, भावामार्फत व्हेनुनूकडून गोपनीयतेच्या करारावर सह्या करवून घेतल्या. मात्र, त्यानंतर लगेचच व्हेनुनू पीटरबरोबर सिडनीहून लंडनला गेला आणि तिथे जाऊन व्हेनुनूने अण्वस्त्रांबाबत त्याला असलेली माहिती, दिमोना आण्विक केंद्रावरील गुपचूप घेतलेले फोटो ‘संडे टाईम्स’ला उघड केले. अर्थातच, ही सगळी माहिती पडताळून पाहिल्याशिवाय ‘संडे टाईम्स’ ती छापणे अशक्य होते. त्याची खातरजमा करण्यासाठी ‘संडे टाईम्स’ने प्रयत्न करायला सुरुवात केली. यादरम्यान, व्हेनुनूला हार्टफोर्डशायर या लहानशा गावी ठेवले गेले होते. तिथे बझाक नावाच्या एका इस्रायली मित्राद्वारे ‘मोसाद’ने व्हेनुनूचे मनसुबे आणि ओळख पटवून घेतली. दरम्यान, माहितीची सत्यता पटल्यावर ‘संडे टाईम्स’ने इस्रायलला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. आता मात्र व्हेनुनूला पकडणे अगत्याचे झाले. मात्र, ब्रिटनच्या तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांना दुखावणे इस्रायलला परवडणारे नव्हते आणि एक दिवस व्हेनुनूची भेट सिंडी नामक एका अमेरिकन प्रवासीशी झाली. ती एक अमेरिकन प्रशिक्षणार्थी ब्युटिशियन म्हणून व्हेनुनूला भेटली. मुळातच स्त्रीलंपट असणारा व्हेनुनू स्मार्ट आणि आकर्षक सिंडीच्या जाळ्यात फासायला वेळ लागणार नव्हताच! कोणत्याही परिस्थितीत ब्रिटनबाहेर न जाण्याची वर्तमानपत्राने दिलेली तंबी विसरून सिंडीच्या गोड बोलण्यात फसून व्हेनुनू तिच्याबरोबर ‘सुट्टी घालविण्यासाठी’ रोममध्ये दाखल झाला. रोममध्ये उतरल्यावर सिंडीने त्याला शहरातील एका जुन्या घरात नेले, जिथे तीन ‘मोसाद’ एजंट्स त्यांची वाटच पाहत होते. तत्काळ व्हेनुनूला पॅरालाइझ्ड करण्याचे इंजेक्शन दिले. त्यानंतर त्याच रात्री ‘लास्पेझिया’ या बंदरावरून ‘नोगा’ या बोटीने त्याला इस्रायलला नेण्यात आले. सिंडीची कामगिरी यशस्वी झाली.
 
शेरील हानीन किंवा शेरील बेन तोव्हचा जन्म (१९६०) आणि बालपण ओर्लांडो फ्लोरिडामध्ये गेले. १९७७ साली शेरील १७ वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला. त्यामुळे मानसिक अस्वस्थता आलेल्या तिला आपल्या शैक्षणिक आणि धार्मिक अभ्यासात झोकून देऊन मन स्थिर करण्याचा सल्ला धर्मगुरूंनी दिला आणि तिने तो मानला. १९७८मध्ये आपले पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आणि जागतिक झेओनिस्ट संघटनेच्या एका अभ्यासक्रमासाठी ती तीन महिने इस्रायलला आली आणि परत गेलीच नाही. याच काळात ती उत्तम हिब्रू भाषा शिकली. ज्यूंचा इतिहास तिने अतिशय सखोल अभ्यासला. तिथेच तिने सैन्यभरतीसाठीचा अर्ज भरला आणि प्रशिक्षणासाठी रुजू झाली. ही परीक्षा उत्तम प्रकारे पास झाल्यावर शेती आणि युद्ध अशा दोन्ही क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या ‘नाहल’ या निमलष्करी दलात तिची नियुक्ती झाली. ‘याद-हाना’ किबुत्झमध्ये काम करताना तिची ओळख ओफर-बेन तोव्हशी झाली. दरम्यान ‘आयक्यू टेस्ट’मध्ये १४० गुण मिळविणाऱ्या, असामान्य प्रतिभा आणि प्रखर राष्ट्रभक्ती असणाऱ्या, अमेरिकन पार्श्वभूमी असणाऱ्या शेरीलचा इस्रायली गुप्तहेर खात्यात प्रवेश निश्चित होताच. मात्र, तिला अपेक्षित असणाऱ्या अरब राष्ट्रांतील कामगिरीसाठी तिची नेमणूक झाली नाही, म्हणून ती नाराज होती. त्यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्त्री प्रशिक्षणार्थीला अरब देशांमध्ये गुप्तहेर म्हणून काम करण्याची संधी मिळत असे.इस्रायल आणि अरब राष्ट्रांमधला संघर्ष लक्षात घेता, ही संधी निश्चितच अधिक जोखमीची आणि म्हणूनच कर्तबगारी दाखवता येईल अशी मानली जात असे.
 
पण, शेरीलला ‘मोसाद’च्या जगभरातील कारवायांमध्ये सामील होण्याची जबाबदारी दिली गेली आणि मग १९८६ सालच्या त्या एका कामगिरीने सिंडी जगभर प्रसिद्ध झाली. अर्थातच, या कामगिरीनंतर अदृश्य होणं तिच्यासाठी अत्यावश्यक बनलं आणि १९८८ नंतर तिला कोणीही पाहिलं किंवा तिच्याशी बोललं नव्हतं. तिला मोसादनेच भूमिगत केल्याचं म्हटलं जात होतं. आपल्याला पळविणाऱ्या लोकांनीच सिंडीला मारून टाकलं, अशी व्हेनुनूची खात्रीच झालेली होती. मात्र, त्यानंतर अचानकच मार्च १९९७ मध्ये एका पत्रकाराने सुदूर फ्लोरिडामध्ये तिला पाहिलं, ओळखलं. आज सिंडी उर्फ शेरील फ्लोरिडामध्ये इस्टेट एजंट म्हणून काम करते आहे आणि आपला नवरा ओफर आणि मुलींबरोबर सुखाचे कौटुंबिक आयुष्य व्यतीत करते आहे.
 
- मैत्रेयी जोशी
@@AUTHORINFO_V1@@