मुंबईकरांसाठी आनंदवार्ता ! धारावीनंतर दादर 'झीरो' पॉइंट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Dec-2020
Total Views |

Dadar_1  H x W:
मुंबई : आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीत नाताळदिनी २५ डिसेंबरला एकही रुग्ण सापडला नव्हता. २६ तारखेलाही दादरमध्येही एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला नाही. ३० एप्रिलनंतर एकही रुग्ण नसणारा दिवस पहिल्यांदाच उगवला, अशी माहिती जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली.
 
 
मुंबईत मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर धारावीसह दादरमध्येही झपाट्याने रुग्णसंख्या वाढत गेली. त्यामुळे पालिकेसमोर आव्हान वाढले. मात्र पालिकेच्या माध्यमातून घरोघरी तपासणी, सर्वेक्षण, जनजागृती, औषधोपचार, निर्जंतुकीकरण आणि पॉझिटिव्ह रुग्ण-क्लोज काँटॅक्टबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात आल्याने रुग्णसंख्या झपाट्याने घटत आहे. दादरमध्ये ३० एप्रिलनंतर पहिल्यांदाच एकही रुग्ण आढळला नाही. दरम्यान, धारावीमध्ये शनिवारी केवळ एका पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद झाली असून माहीममध्ये ७ नवे रुग्ण नोंदवले गेले आहेत.
 
 
२६ डिसेंबरची ‘जी उत्तर’ची स्थिती
 
 
ठिकाण           एकूण            अ‍ॅक्टिव्ह           डिस्चार्ज
दादर               ४७५०               १०२               ४४७५
माहीम             ४५६८               २०९               ४२१५
धारावी             ३७८९                  १३              ३४६४
एकूण            १३१०७               ३२४             १२१५४
 
‘जी उत्तर’ कोरोनामुक्तीकडे
 
धारावीची दाटीवाटीची झोपडपट्टी असलेल्या धारावीसह गर्दीचे ठिकाण दादर आणि माहीम परिसर असलेल्या ‘जी-उत्तर’ विभागात कोरोना रुग्णसंख्या आता आटोक्यात येत आहे. या विभागात आतापर्यंत आढळलेल्या एकूण १३१०७ रुग्णांपैकी १२ हजार १५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. संपूर्ण प्रभागात केवळ ३२४ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यामुळे जी-उत्तर प्रभागाने कोरोनामुक्तीकडे वाटचाल केल्याचे स्पष्ट होत आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@