बड्या कंपन्यांना 'टेस्ला'ने केले 'ओव्हरटेक'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2020   
Total Views |
TESLA_1  H x W: 
 
 
 


एलन मस्क : एक असा असामान्य माणूस जो भविष्य जगतो...




 २००४ मध्ये सुरू झालेल्या टेस्ला या केवळ १६ वर्षीय जुन्या कंपनीने अमेरिकेची ऑटोमोबाईल राजधानी मानल्या जाणाऱ्या डेट्रॉयटच्या सर्व कंपन्यांना आव्हान दिले आहे. टेस्ला दरवर्षी पाच लाखांहून गाड्यांची निर्मिती करू शकते तरीही टेस्लाने ग्राहकांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे. कार उत्पादन क्षेत्रातील बड्या उद्योगांचे भांडवल एकीकडे आणि टेस्लाचे भांडवल एकीकडे, अशी आजची स्थिती बनली आहे. या दहा बड्या कंपन्यांचे भांडवल ४९.१५ लाख कोटी रुपये आहे. तर टेस्लाचे एकूण भांडवल हे ४८.५० लाख कोटी रुपये आहे.
 
 
 
 
सुरुवातीच्या १० बड्या कंपन्यांमध्ये टोयोटा, फॉक्सवैगन, मर्सिडीज, GM, BMW, होंडा, फिएट, फोर्ड, निसान, सुबारू आदींचा सामावेश आहे. या कंपन्या पोर्शे, बेंटले, रोल्स रॉयस, बुगाटी आणि लँड क्रूझर आदी आलीशान गाड्यांची विक्री करतात. या कंपन्यांची एकूण कमाई ही ९८ लाख कोटी आहे. तर टेस्लाची कमाई ही २ लाख कोटी इतकीच आहे. या कंपन्यांपेक्षा ४८ टक्के कमी कमावूनही टेस्ला हे नाव वाहननिर्मिती क्षेत्रातील उज्वल भवितव्य मानल्यामुळे याचे शेअर वधारत आहेत. दरम्यान, सध्या शेअर बाजारात या शेअरची किंमत ४९ हजार रुपये इतकी आहे.
 
 
 
टेस्ला हेच भविष्य! 
 
टेस्लाने पहली इलेक्ट्रिक कार- रोडस्टर २००८ मध्ये बाजारात आणली होती. इलेक्ट्रिक गाड्यांची एक नवी उंची त्यांनी निर्माण केली. लोकांना आत्मविश्वास निर्माण केला. विजेवर चालणारी ही वाहने स्टायलीश आणि वेगवानही असू शकतात हा विश्वास ग्राहकांमध्ये निर्माण केला. २०१८ मध्ये टेस्लातर्फे रोडस्टरचे नवे मॉडेल बाजारात आणले होते. मात्र १.९ सेकंदात शंभर किमी प्रतितास इतका वेग ही कार घेऊ शकते. तसेच चारशे किमी प्रतितास ही गाडी धावू शकते.
 
 
 
 
 
 
जागोजागी चार्जिंग स्टेशन
 
टेस्लाने कार निर्मितीवरच लक्ष केंद्रीत न करता ज्या भागात ग्राहक राहतात तिथे चार्जिंग स्टेशनही तयार केले. टेस्लाची चार्जिंग स्टेशन पूर्ण अमेरिका, युरोप आणि चीनमध्ये पसरले आहेत. त्यामुळे ग्राहकांना सोयीचे ठरत असते.
 
 
पर्यावरणाचा विचार
 
इलॉन मस्क हे पर्यावरण विषयावर संवेदनशील आहेत. त्यांनी ट्रम्प प्रशासाला कार्बन टॅक्स या वर गंभीर विचार करण्यास सांगितले होते. मात्र, ट्रम्प यांनी पॅरीस करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. २०१५ मध्ये त्यांनी कार्बन टॅक्स लावण्याचा विचार केला होता. २०१५ मध्ये पॅरीसमध्ये एका भाषणातही कार्बन टॅक्सची मागणी केली होती.
 
 
 
 
 
 
नव्या तंत्रज्ञानाचा सम्राट
 
 
एलन मस्क याने तंत्रज्ञानाशी जुळवून घेत इलन मस्क यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. २०१६ मध्ये टेस्लातर्फे एक सोलर सिटी निर्माण केली आहे. त्यात कंपन्यांशी भागीदारी केली होती. २०१७ मध्ये 'टेस्ला सोलर रुफ प्रो़डक्ट' लॉन्च केले होते. २०१७ मध्ये मस्क यांच्या कंपनीने 'न्यूरालिंक'ची स्थापना केली होती. मानवी शरीराच्या मेंदूत इम्लांट केल्या जाणाऱ्या डिव्हाईसची निर्मिती ही कंपनी करते. २०१८ मध्ये लॉस एंजेलिसच्या ट्रॅफिकच्या मुद्द्यावर मस्क यांनी बोरिंग कंपनी सुरू केली होती. महामार्गाच्या खालून सुरुंग खोदण्याचे काम ही कंपनी करते. त्याद्वारे वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. स्पेस एक्स फॉल्कन हेवी रॉकेटचे प्रक्षेपण केले होते. त्याद्वारे लाल रंगाच्या टेस्ला रोडस्टरला अंतराळात नेण्यात आले आहे.
 
 
 
 
मस्क कधी समाधानी होणार ?
 
 
तुम्ही समाधानी कधी होणार, हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. "मी तोपर्यंत समाधानी होणार नाही जोपर्यंत मंगळ ग्रहावर कब्जा करणार नाही.", असे उत्तर त्यांनी मिश्कील हसत दिले होते. 


@@AUTHORINFO_V1@@