कृषी कायद्यात देखील शेतकरी हिताचे निर्णय असल्याचे वक्तव्य
मुंबई: भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी साताऱ्याहून मुंबईकडे जात असताना काही शेतकरी महिला स्वतः आपला माल विकताना पाहून थांबले. आणि त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली. यावेळचे काही फोटो समाजमाध्यमांवर टाकत त्यांनी या महिलांचे कौतुक केले.
हे फोटो समाज माध्यमांवर टाकताना प्रवीण दरेकर यांनी म्हटले की, "साताऱ्याहून मुंबईकडे येत असताना, एक प्रेरणादायी दृश्य पहायला मिळाले. शेतकरी महिला आपला शेतमाल थेट ग्राहकांना विकत असून,त्यामुळे शेतकऱ्यांनाचं फायदा होतं असल्याचे दिसून आले. नवीन कृषी कायद्यात देखील शेतकरी हिताचे निर्णय घेण्यात आल्याने देशभरातील शेतकरी राजा सुखी होणार आहे."