शुभ्र झग्यामागचे गलिच्छ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Dec-2020
Total Views |

Germany_1  H x
 
 
 
लहान लहान बालकांना इतरांच्या हाती लैंगिक शोषणासाठी किंवा सेक्स पार्टीसाठी सोपवून अनाथ बालकाश्रमातील नन ‘जिस्म की दलाली’च करायची, तेही चेहऱ्यावर दयाभाव, कारुण्यभाव घेऊन! पाद्री, बिशप्स, राजकारणी आणि व्यापारी मंडळी या बालकांवर पशूपेक्षाही आत्यंतिक त्वेषाने तुटून पडत नि एका एका वेळी तीन-तीन जणही या छोट्या जीवांवर बलात्कार करत असत.
 
कोरोनासंकटाचा कहर सुरू असतानाही ख्रिश्चनबहुल देशांमध्ये येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस-नाताळ उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, नाताळच्या उत्सवी आनंदात चर्च, अनाथ बालकाश्रमांत लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या बालकांच्या, मुली-महिलांच्या किंकाळ्या कोणी ऐकल्या का? तर नाहीच, संवेदनशील मने वगळता करुणेचा मुखवटा धारण केलेल्यांनी उलट पीडितांचा आवाज दाबण्याचेच काम केले. कारण तसे नसते, तर आज जर्मनीतील न्यायालयाने लैंगिक शोषणाप्रकरणी अत्याचारग्रस्ताला दिलेल्या नुकसानभरपाईच्या बातम्यांनी आणि चर्च तसेच अनाथ बालकाश्रमाच्या भयावह चेहऱ्याच्या कहाण्यांनी माध्यमी अवकाश व्यापले असते. पण, तसे झाले नाही आणि हे जर्मनीतल्या प्रकरणाबद्दलच नाही तर २३ डिसेंबरला केरळमधील सीबीआय न्यायालयाने ‘सिस्टर अभया’च्या हत्येप्रकरणी २८ वर्षांनंतर दोषी पाद्री व ननला सुनावलेल्या शिक्षेबाबतही झाले.
 
 
 
अर्थात, ख्रिश्चन वा मुस्लिमांनी केलेल्या अन्याय-अत्याचारांच्या वृत्तांना वर्तमानपत्राच्या एखाद्या कोपऱ्यात किंवा वृत्तवाहिनीच्या ५०/१०० बातम्यांच्या ‘लॉट’मध्ये स्थान द्यायचे, हा प्रकार वर्षानुवर्षे सुरूच आहे. अशा प्रकरणांवर कधी अग्रलेख येणार नाही वा आला तरी तो मागे घेतला जाईल किंवा वृत्तवाहिन्यांच्या भल्यामोठ्या स्टुडिओत तावातावाने चर्चाही झडणार नाहीत. मुख्य प्रवाहातील माध्यमांचा हा निवडकपणा कुठवर चालेल हे त्यांचे त्यांनाच माहिती; पण म्हणून आपण पीडितांवरील अन्यायाला वाचा फोडण्याचे, त्यांचा आवाज समोर आणण्याचे काम सोडू शकत नाही. अन्य माध्यमे अत्याचारग्रस्तांकडे मानवी नव्हे तर धर्माच्या चष्म्यातून पाहून कोणाला प्रसिद्धी द्यायची आणि कोणाला नाही, याचा निवाडा करत असली तरी आपण सर्वांकडे माणुसकीच्याच दृष्टीने पाहिले पाहिजे, पीडितांच्या रक्ताने लाल झालेला पांढरा झगा जगासमोर आला पाहिजे!
 
 
 
जर्मनीतील स्पियर शहरातील कॅथॉलिक ख्रिश्चन ननद्वारे चालविल्या जाणाऱ्या ‘डिव्हाईन सेव्हियर चिल्ड्रन होम’मध्ये पीडित व्यक्ती १९६० ते १९७० दरम्यान राहायला गेली. मात्र, कोवळ्या वयात येशू व नन, सिस्टर, पाद्री वगैरेंवर अतिशय निरागसतेने विश्वास ठेवून अनाथ बालकाश्रमात पाऊल ठेवलेल्या सदर व्यक्तीला प्रत्यक्षात आपल्यासमोर काय वाढून ठेवले, याचा जराही अंदाज नव्हता. नंतर नंतर अनाथ बालकाश्रमाची खरी ओळख पीडिताला होऊ लागली नि तिने सांगितलेल्या अनुभवांवरून कोणाचाही थरकाप उडेल, इतकी ती भीषण, बीभत्स व मानवतेला काळिमा फासणारी होती. अनाथ बालकाश्रमाचे संचालन करणारी ननच इथल्या ७ ते १४ वर्षे वयाच्या बालकांना चर्चमधील पाद्री, बिशप्स, राजकीय व्यक्ती आणि व्यापाऱ्यांसमोर उभी करायची. त्या बदल्यात ननला अफाट पैसा मिळे, म्हणजे अशाप्रकारे लहान लहान बालकांना इतरांच्या हाती लैंगिक शोषणासाठी किंवा सेक्स पार्टीसाठी सोपवून सदर नन ‘जिस्म की दलाली’च करायची, तेही चेहऱ्यावर दयाभाव, कारुण्यभाव घेऊन! पाद्री, बिशप्स, राजकारणी आणि व्यापारी मंडळी या बालकांवर पशूपेक्षाही आत्यंतिक त्वेषाने तुटून पडत नि एका एका वेळी तीन-तीन जणही या छोट्या जीवांवर बलात्कार करत असत.
 
 
 
अत्याचारग्रस्त व्यक्तीने सांगितलेल्या माहितीनुसार सुमारे एक हजार वेळा चर्चच्या पाद्री, बिशप्स आणि राजकीय व्यक्ती, व्यापाऱ्यांनी तिचे लैंगिक शोषण केले. दरम्यानच्या काळात ही बालके आपल्यावरील अनैसर्गिक व विकृत अन्यायाला आपल्या इवल्याशा शक्तीने विरोध करत असत. पण, तरीही भाविकांसमोर स्नेहार्द्र, दयार्द्रतेने येणाऱ्या पाद्री, बिशप्सची हृदये द्रवत नसत. तर एखादी खेळण्यातली बाहुली वा बाहुला हातात कुस्करायला दिल्याच्या आवेशाने ही लोकं या बालकांनाच मारहाण करत नि आपल्या विकृत इच्छा ‘डिव्हाईन सेव्हियर’ नावाखाली पूर्ण करत असत! सोबतच अनाथ बालकाश्रमाचे संचालन करणारी ननदेखील कधी कधी इथल्या बालकांचा लैंगिक छळ करत असे नि असे सांगणारी एक नव्हे तर आणखी तीन माणसेही समोर आली आहेत. एकूणच येशूच्या मानवतावादी रूपाचा आभास निर्माण करून प्रत्यक्षात अनाथ बालकाश्रमात नन आणि पाद्री, बिशप्स वगैरे अमानुष कृत्येच करत असल्याचे यावरून स्पष्ट होते.
 
 
 
पुढे सन २००० साली जर्मनीच्या स्पियर शहरातील सदर अनाथ बालकाश्रम बंद करण्यात आले आणि आता या अत्याचारी चाळ्यांचा निवाडा डार्मस्टॅडमधील न्यायालयाने केला. इथल्या समाजकल्याण न्यायालयाने ६३ वर्षीय पीडित व्यक्तीला नुकसानभरपाईचे आदेश दिले. पण, त्यावर अत्याचारग्रस्त व्यक्तीने अत्यंत काकुळतीने सवाल विचारला की, सततच्या लैंगिक शोषण व बलात्काराने माझ्या मनावर झालेल्या आघाताचे, माझ्या शरीराला झालेल्या व्याधींचे समाधान काय? मात्र, हा सवाल चर्चमधल्या घंटांच्या घणघणाटामुळे पाद्री वा बिशप्स किंवा व्हॅटिकन सिटीत बसलेल्या ख्रिश्चनांच्या सर्वोच्च पोपना ऐकू जाईल का, जेणेकरून पुन्हा कोणी अशा कुकृत्यांना बळी पडू नये.
 
 
दरम्यान, जर्मनीतल्या ख्रिश्चन अनाथ बालकाश्रमातील गलिच्छ कारनाम्यांचा निकाल लागत असतानाच केरळमधील हत्या केलेल्या ‘सिस्टर अभया’ला ख्रिसमस गिफ्ट मिळाले आणि पाद्री व ननला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली. पण, नेहमीप्रमाणे प्रसारमाध्यमांनी त्यावरून मानवता संपल्याचा किंवा ख्रिश्चन धर्म मानवतेसमोरील धोका असल्याचा आरडाओरडा केला नाही. हेच एखाद्या मंदिर वा हिंदू साधूबद्दल घडले असते तर माध्यमांनी २४ तास तोच विषय चालवला असता. समस्त हिंदू धर्मीयांना गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभे करून स्वतः न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरून न्यायालयापेक्षाही निराळी शिक्षा सुनावली असती. पण, इथे शोषक ख्रिश्चन होते, स्थळ ख्रिश्चन होते, तेव्हा भारतातील तथाकथित माध्यमांनी चिडिचूप होणे साहजिकच. अर्थात, ही केरळमधील किंवा जर्मनीतील किंवा जगातीलही एकमेव घटना नाही. २०१० नंतर जर्मनीतील या कॅथॉलिक ख्रिश्चन चर्चेस व अनाथ बालकाश्रमातील लैंगिक शोषणाचे अनेकानेक प्रकार एकामागोमाग उघड झाले. २०१८ सालच्या दुर्व्यवहारविषयक चौकशीत १९४६ पासून २०१४ दरम्यान, सुमारे एक हजार ६७० पाद्रींनी तीन हजार ६७७ बालकांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले. त्यावर कायदेशीर कारवायाही होतीलच; पण चर्च, अनाथ बालकाश्रमे किंवा तिथल्या नन्समुळे आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या जीवांचे काय? त्याची भरपाई कोण आणि कशी करणार?
 
@@AUTHORINFO_V1@@