सावध व्हा! मोबाईल Appद्वारे लोन घेणाऱ्या तिघांवर आत्महत्येची वेळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2020
Total Views |
RBI online fraud _1 
 
 



मुंबई : तुम्हीही विनाकारण मोबाईल अॅप्सद्वारे कर्ज घेण्याच्या जाळ्यात ओढले जाऊ शकता यासाठी वेळीच अलर्ट राहणे गरजेचे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ऑनलाईन लोन देणाऱ्या अॅप्समुळे तीन व्यक्तींना आत्महत्या करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तेलंगणा पोलीसांनी या प्रकरणात १६ जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. जे अशाप्रकारे लोकांना लुबाडण्याचे उद्योग करत होते.

हैदराबादचे आहे प्रकरण


ऑनलाईन लोन घेतले म्हणून तिघांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने मंजूरी न दिलेल्या ३० मोबाईल अॅप्सवर ही कारवाई करण्यात येत आहे. ऑफर्स आणि विविध प्रलोभने देऊन ३५ टक्के व्याजाने परतफेड करून घेतली जात होते. म्हणजे तीन महिन्यात मुद्दलीच्या दुप्पट व्याज होत असे. त्यानंतर असे मोबाईल अॅप्स चालवणारे मालक ग्राहकांना लुबाडणे सुरू करत असत. तसेच धमक्यांचे फोनही येत असत. याच मानसिक त्रासाला कंटाळून तीन जणांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येच्या तपासात हा प्रकार उघडकीस आला.
 
 
७५ बँक खात्यांमध्ये होती ४२३ कोटींची माया
 
या प्रकरणात हैदराबाद पोलीसांनी आतापर्यंत ७५ बँक अकाउंट खाती गोठवली आहेत. या खात्यांमध्ये एकूण ४२३ कोटी जमा होते. तेलंगाणा पोलीसांनी १६ जणांना अटक केली आहे. सायबर पोलीसांनी या प्रकारणाचा तपास सुरू ठेवला आहे. मोबाईल अॅप्सद्वारे ऑनलाईन मार्केटींग करणाऱ्यांना दणका देण्याचा निर्णय पोलीसांनी घेतला आहे. या सर्वांचा सुत्रधार सरथ चंद्र गजाआड झाला आहे.
 
 
अमेरिकेतून घेतले आहे शिक्षण
 
सरथ चंद्रने अमेरिकेतून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. दोन कंपन्यांमार्फत तो लोकांना उधारीचे पैसे देत होता. त्याची कंपनी क्रेडीट प्रा. लि. आणि क्रेड फॉक्स टेक्नोलॉजीज् बंगळुरू ऑनलाईन कर्ज अॅप विकत होती. या बनावट कामासाठी त्याने हैदराबाद आणि गुरुग्राममध्ये कॉल सेंटर तयार केले होते. तीन लोकांनी या प्रकाराला कंटाळून आत्महत्या केली तेव्हा या प्रकरणाची उकल झाली. हैदराबाद और गुरुग्राममध्ये पोलीसांनी छापा टाकून कर्ज देणाऱ्या भामट्यांची पोलखोल केली आहे. या अॅप्सद्वारे तीन कॉल सेंटरमध्ये एकूण एक हजार जणांना नोकरीवर ठेवण्यात आले होते. यात सर्वाधिक संख्या पदवीधरांची होती.
 
 
रिझर्व्ह बँकेने दिला इशारा
 
 
आरबीआयतर्फे बुधवारी सर्व ग्राहकांना एक सूचना जाहीर केली आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे मोबाईल अॅपद्वारे कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या प्रलोभनांना भुलू नका, असा इशारा यात देण्यात आला आहे. त्वरित लोन मिळवा, अशा जाहीरातींद्वारे अनेकांना गंडा घातला जात आहे. आरबीआयने अशावेळी ग्राहकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. अशाप्रकारे रक्कम देऊन ग्राहकांना कागदपत्रांमध्ये व अटीशर्थींमध्ये अडकवण्याचा प्रयत्न असू शकतो, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
 
 
 
डिजिटल युगात वावरताना सावध रहा !
 
 
आरबीआयतर्फे डिजिटल प्लॅटफॉर्म आणि मोबाईल अॅपद्वारे मिळणाऱ्या प्रलोभनांना भूलता कामा नये. कर्ज देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांची माहिती तपासून घ्या. व्याजाच्या आकडेवारीत फसवणूक करून ग्राहकांना लुबाडण्याचा प्रकार तर नाही ना, याचीही शहानिशा करायला हवी, असेही आरबीआय म्हणते. या प्रकरणात ग्राहकांच्या माहितीचाही चुकीचा वापर केला जाऊ शकतो. https://sachet.rbi.org.in/ या लिंकवर जाऊन ग्राहक तक्रारही करू शकतात.



@@AUTHORINFO_V1@@