कल्याण डोंबिवलीत ब्रिटनहून ५५ जण परतले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Dec-2020
Total Views |
KDMC _1  H x W:
 
 

कल्याण : ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे दक्षतेचा उपाय म्हणून परदेशातून परतणाऱ्या प्रवाशांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. यातच आता गेल्या महिन्यात कल्याण-डोंबिवलीत ब्रिटनहून ५५ जण परतले असल्याची माहिती उघड झाली आहे. राज्य शासनाने कल्याण-डोंबिवली महापालिकेला ५५ जणांची यादी व वैद्यकीय मार्गदर्शक सूचना ही पाठविल्या आहेत. आता या ५५ जणांची पालिका आरोग्य विभागातर्फे कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
 
 
काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे सर्व जगाची चिंता वाढली आहे. राज्य सरकारने ही आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. गेल्या महिन्यात ब्रिटनहून कल्याण-डोंबिवलीमध्ये परतलेल्या ५५ जणांची यादी राज्य सरकारने पालिका प्रशासनाला पाठविली आहे. या प्रवाशांची कोविड चाचणी घेण्यासह ज्यांची चाचणी पॉङिाटिव्ह येईल त्यांचे अहवाल पुण्याच्या एनआयव्ही (नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी) कडे पाठविण्याचे निर्देश ही राज्य शासनातर्फे देण्यात आले आहेत.
 
 
कल्याण डोंबिवलीचा आरोग्य विभाग या ५५ जणांच्या यादीनुसार या सर्वाच्या घरी जाऊन ट्रेसिंग करणार आहे. या सर्वाच्या घरी जाऊन कुणाला कोरोनाची चिन्हे आढळतात का ते पाहण्यात येणार आहे. तसेच ब्रिटनमधून २५ नोव्हेंबरनंतर कल्याण डोंबिवलीत आलेल्या प्रवाशांनी स्वत:हून आरोग्य विभागाकडे संपर्क साधण्याचे आवाहान पालिकेतर्फे करण्यात आले आहे.


@@AUTHORINFO_V1@@