नवा कोरोना विषाणू भारतात आला का ? : संशोधक काय म्हणतात ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2020
Total Views |

Covid 20 _1  H
 

नवी दिल्ली : राष्ट्रीय संशोधन संस्था (NARI) तर्फे ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूबद्दल महत्वाचे वक्तव्य केले आहे. कोरोना विषाणू संदर्भात केलेल्या संशोधनात ब्रिटनमध्ये आलेल्या विषाणूचे नवे म्युटंट आढळेला नाही, असा खुलासा करण्यात आला आहे. NARI इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) शाखा आहे.
 
 
 
NARI चे निर्देशक डॉ. समिरन पांडा यांनी मंगळवारी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. नव्या कोरोना विषाणूचा शोध घेण्यासाठी देशभरातील विविध जागांवरून गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. मात्र, यात ब्रिटनमध्ये आढळला जाणारा कोरोना विषाणू आढळलेला नाही. हा नवा विषाणू कसा पसरेल याबद्दल अद्याप सांगता येत नसले तरीही ही गोष्ट गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. हा विषाणू रुग्णाच्या शरीरावर गंभीर परिणाम करतो का याबद्दल अद्याप संशोधन झालेले नाही.
 
 
 
भारतातील कोरोना विषाणूत बदल झालेला नाही
 
 
डॉ. पांडा म्हणाले, आपल्या देशात पसरणाऱ्या कोरोना विषाणूवर आम्ही नजर ठेवून आहोत. गेले सात महिने ही प्रक्रीया सुरू आहे. त्यासाठी दोन हजार नमुने तपासले आहेत. मात्र, त्यात बदल आढळला नाही. असेही नाही की भारतातील संपूर्ण कोरोना विषाणू एकसारखाच प्रभाव करत आहे काही राज्यांमध्ये तो गतीने पसरत आहे.
 
 
 
लॉकडाऊन गरजेचा आहे का तज्ज्ञांचे मत काय ?
 
 
ते म्हणाले, "देशात कोरोना विषाणू येवो न येवो या विषाणूची शृंखला तोडण्यासाठी कडक पावले उचलणे गरजेचे आहे. कोरोना विषाणूशी संलग्न असलेले एकूण ११ विषाणू आढळले आहेत. मात्र, त्यापासून घाबरून जाण्याचे कारण नाही. ही वेळ अशा विषाणूंवर नजर ठेवण्याची आहे.
 
 
 
 
लसचा परिणाम होणार नाही, असा विचार नको
 
डॉ. पांडा म्हणतात, कोरोना विषाणू विरोधात लढण्यासाठी शरीरातील रोगप्रतिकार शक्ती काम करत असते. मात्र, प्रभावी काम करण्यासाठी कोरोना लस निर्मिती करण्यात आली आहे. त्यावर आता शंका उपस्थित करणे योग्य नाही. त्यासाठी आता वेगळे प्रमाणपत्र उपलब्ध नाही, असेही ते म्हणाले.




@@AUTHORINFO_V1@@