पादरी-ननला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले म्हणून केली अभयाची हत्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2020
Total Views |

Father _2  H x
 
 
(सिस्टर अभयाची हत्या करणारे तिनही आरोपी)

'सिस्टर अभया हत्याकांड' : २८ वर्षांनी मिळाला न्याय

 
 
 
तिरुअनंतपुरम : केरळमध्ये तिरुअनंतपुरमच्या विशेष सीबीआय न्यायालयाने २८ वर्षे जुन्या 'सिस्टर अभया हत्याकांड' प्रकरणात आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यापूर्वी न्यायालयाने मंगळवारी एक पादरी आणि एका ननवर दोषी असल्याचा ठपका ठेवला होता. न्यायालयाने तिन्ही दोशींवर प्रत्येकी पाच लाखांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी पीडितेला २८ वर्षांचा कालावधी लागला.
 
 
नेमके प्रकरण काय ?
 
 
२८ वर्षांपूर्वी २७ मार्च १९९२ रोजी केरळमध्ये कोट्टायमच्या सेंट पायस कॉन्व्हेंट (Pius Convent) १९ वर्षीय सिस्टर अभयाचा मृतदेह एका विहीरीत आढळला होता. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी पादरी आणि ननवर ठपका ठेवण्यात आला आहे.
 
 
का केली होती अभयाची हत्या
 
 
सीबीआय (CBI) चार्जशीटनुसार, गुन्ह्याच्या दिवशी सिस्टर अभया एका परीक्षेसाठी सकाळी लवकर उठली होती. त्यावेळी चार वाजले होते. त्यावेळी ती किचनमध्ये गेली तेव्हा तीने दोन पादरी आणि एका ननला आक्षेपार्ह स्थितीत पाहिले होते. सिस्टर अभयाच्या हत्येचा आरोप फादर जोस पूथरुकायिल, फादर थॉमस कोट्टूर आणि सेफीवर लावण्यात आला होता.
दोन पादरी आणि नन रात्रीच्या वेळेस आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्याचे सिस्टर अभयाने पाहिल्यावर ती कुणाला ही गोष्ट सांगेल, या भीतीने त्या तिघांनीही तिच्यावर हल्ला केला. अभया या हल्ल्यात बेशुद्ध झाली. त्यानंतर सिस्टर सोफीने कुऱ्हाडीने अभयाच्या डोक्यात घाव घातला. त्यात अभयाचा मृत्यू झाला. आरोपींनी अभयाचा मृतदेह विहीरीत टाकून दिला.
 
 
 
 
एका साक्षीदारामुळे होऊ शकली गुन्ह्याची उकल
 
 
सिस्टर अभया हत्याकांड प्रकरणात सीबीआय विशेष न्यायालयाने २९ ऑगस्ट २०१९ रोजी अ़क्का राजू याला साक्षीदार नेमण्यात आला. एका फरार आरोपीवर कित्येक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते. राजूने साक्ष देत असताना २७ मार्च १९९२ रोजीच्या रात्री उशीरा रात्री फादर थॉमस कुट्टूरसह दोन लोकांना या सेंट पायस कॉन्वेंट परिसरात पाहिले होते.
 
 

Father _1  H x  
 
 
 
 
काय होती ती साक्ष ?
 
अडक्का राजूने सीबीआय विशेष न्यायालयात साक्ष दिली की, "मी त्यावेळी कॉन्वेंट बिल्डिंगच्या छतावर एका वीजवाहकातून तांब्याची चोरी करत होतो. त्यावेळी मी दोघांना शीडीवर चढताना पाहिले. ते दोघे टॉर्चद्वारे काहीतरी शोधत होते. त्यात एक उंच व्यक्ती होता दुसरे फादर कोट्टूर होते. त्यांना पाहून मी चोरीचा बेत रद्द केला आणि तिथून निघून गेलो."
 
 
 
 
राजूने दिली फादर कोट्टुर यांची ओळख
 
 
अडक्का राजूची साक्ष एर्नाकुलम न्यायिक प्रथम श्रेणीच्या मॅजिस्ट्रेट पुढे शपथपत्रात सादर करण्यात आली होती. त्यावेळी उपस्थित फादर कोट्टुरला साक्षीदाराने ओळख दिली. त्यानंतर राजूने सिस्टर अभया मृत्यू प्रकरणात तपास करणाऱ्या टीमवरही आरोप लावले होते. क्राइम ब्रांचच्या हेरांनी त्याला दोन महिने कस्टडीत ठेवले होते. सुनावणीवेळी बचाव पक्षाने वकील अडक्का राजूच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर बोट ठेवले होते. त्याच्यावर असलेल्या १० गुन्ह्यांची नोंद असल्याचे म्हटले होते. राजूने आपली गुन्हेगारी मानण्यास नकार दिला आहे. मात्र, न्यायालयाने त्याची साक्ष महत्वाची मानत हा २८ वर्ष सुरू असलेल्या खटल्यात निकाल दिला.




@@AUTHORINFO_V1@@