कोरोना लसीत डुकराची चरबी, रझा अकादमीने काढला 'हा' फतवा

    23-Dec-2020
Total Views |
eee_1  H x W: 0



पुढील सूचना येईपर्यंत कोरोना लस टोचून घेऊ नका :

मुंबई : अनेक महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेली कोरोना लस अंतिम टप्प्यात असताना आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. मुस्लिम संयुक्त अरब अमीराततर्फे (UAE) इस्लामिक परिषद असलेल्या युएई फतवा कौन्सिलने लसीत डुक्कराचे मांसाच्या जिलेटीनचा वापर असूनही तिचा वापर योग्य असल्याच्या सूचना दिल्या आहेत. कौन्सिलचे अध्यक्ष शेख अब्दुल्ला बिन बय्या म्हणले की जर आता काही पर्यायच नाही तर इस्लामी बंधनांपासून मुक्त ठेवता येईल. प्रथमतः मानवी जीवनाला वाचवणे हे आपले प्राधान्य असेल, असे त्यांनी सांगितले.
 
 
लसीकरणासाठी डुक्कराचे जिलेटीन वापरला जाते
 
 
कौन्सिल म्हणाले, या प्रकरणात पोर्क जिलेटीनचा औषध म्हणून वापर केला जात आहे. भोजन म्हणून नव्हे. त्यामुळे मुस्लीमांना कोरोना लसीपासून आराम मिळू शकतो. कोरोना लसीत पोर्क जिलेटिनचा वापर केला जातो. मुस्लीम समजात पोर्कचे सेवन हराम मानले जाते त्यामुळे ही चिंता वाढली आहे.
 
 
रझा अकादमी काय म्हणते ?
 
 
मुंबईतील रझा अकादमीच्या मौलाना सईद नूरी यांनी फतवा दिला आहे. आम्ही आधी लसीमध्ये डुक्कराचे मांस आहे की नाही ते पाहणार आहोत. त्यानंतर मंजूरी मिळाल्यावरच मुस्लीमांनी ही लस घ्यावी, असा फतवा रझा अकादमीने काढला आहे.