सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या ३ टक्क्यांपेक्षाही कमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2020
Total Views |
Covid 19_1  H x



नवी दिल्ली : भारताच्या एकूण सक्रीय रुग्ण संख्येत घट होण्याचा कल सुरुच आहे. देशात आज सक्रीय रुग्ण संख्या २,८९,२४० आहे. एकूण पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत, सक्रीय रुग्णांचे प्रमाण आणखी कमी होत ते २.८६% झाले आहे. २६ राज्ये/ केंद्र शासित प्रदेशात १०,००० पेक्षा कमी सक्रीय रुग्ण आहेत. दैनंदिन बऱ्या होणाऱ्यांची संख्या, दैनंदिन रुग्ण संख्येपेक्षा जास्त असल्याने एकूण सक्रीय रुग्ण संख्येत घट होत आहे.
 
 
गेल्या २४ तासात २३,९५० जण पॉझिटीव्ह आढळले तर याच काळात २६,८९५ जण कोरोनातून बरे झाले. गेल्या २४ तासात एकूण सक्रीय रुग्ण संख्येत ३,२७८ ची घट नोंदवण्यात आली आहे. भारतात एकूण चाचण्यांची संख्या १६.५ कोटी (१६,४२,६८,७२१) झाली आहे. दर दिवशी दहा लाखापेक्षा जास्त चाचण्यांचे उद्दिष्ट राखत गेल्या २४ तासात १०,९८,१६४ चाचण्या करण्यात आल्या.
 
 
चाचण्या करण्याची देशाची प्रती दिवस क्षमता १५ लाख चाचण्याइतकी झाली आहे. चाचण्या करण्याच्या देशाच्या पायाभूत संरचनेला मोठी चालना मिळाली असून देशात आता २,२७६ प्रयोगशाळा आहेत. दररोज सुमारे १० लाख चाचण्याहून अधिक होणाऱ्या चाचण्यामुळे पॉझिटीव्हिटी दर कमी राखण्याची निश्चिती झाली असून तो उतरता राहिला आहे. भारतात दर दहा लाख लोकसंख्येमागे १,१९,०३५ चाचण्या करण्यात येत असून २३ राज्ये/ केंद्र शासित प्रदेशात या चाचण्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा उत्तम आहे.
 
 
एकूण बरे झालेल्यांची संख्या ९,६६३,३८२ झाली असून बरे होण्याच्या दरात वाढ होऊन तो ९५.६९% झाला आहे. बरे झालेल्यांपैकी ७५.८७% रुग्ण १० राज्य/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत. केरळमध्ये दैनंदिन सर्वात जास्त म्हणजे ५,०५७ रुग्ण कोरोनातून मुक्त झाले असून महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ४,१२२ आणि पश्चिम बंगाल मध्ये २,२७० जण बरे झाले. नव्या रुग्णांपैकी ७७.३४% रुग्ण १० राज्य/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत.
केरळमध्ये दैनंदिन सर्वात जास्त म्हणजे ६,०४९ कोरोना रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात ३,१०६ रुग्णांची नोंद झाली. गेल्या २४ तासात ३३३ मृत्यूंची नोंद झाली, या पैकी सुमारे ७५.३८% मृत्यू १० राज्य/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे दैनंदिन ७५ मृत्यूंची नोंद झाली. पश्चिम बंगाल मध्ये ३८ आणि केरळ मध्ये २७ मृत्यूंची नोंद झाली.



@@AUTHORINFO_V1@@