३०५० सालीही तुम्हीच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Dec-2020   
Total Views |

Uddhav Thackeray_1 &
 
 
 
ते म्हणाले की, मी २०५० सालीही मुख्यमंत्री असेन. पण, मग तेव्हा त्यांचे बाळराजे कोण असतील? हं. पण, त्यांची काळजी, चिंता करण्याची गरज नाही. कारण साहेबांनी आधीच म्हटले आहे की, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी.’ मात्र, त्यावेळी आताचे कार्यकर्ते काय करत असतील? आता काही लोक म्हणतील की, तुम्हाला का चिंता?
 
 
 
२०५० सालीसुद्धा तेच मुख्यमंत्री राहणार आहेत. आता त्यांचे वय २०२० साली ६० वर्षे आहे. मग २०५० साली त्यांचे वय किती असेल? बापरे ९० वर्षे. मुद्दा गौण आहे बरं का! आता जसे फेसबुक लाईव्ह करून राज्य कारभार हाकतात, तसेच तेव्हाही हाकतील. तसे पाहायला गेले तर कारभार पाहतील, हा शब्द योग्य आहे. पण, ‘मुकी बिचारी कुणीही हाका’ हा शब्दप्रयोग महाराष्ट्रातील बहुसंख्य मतदाराला लागू झाला आहे. ‘बोया अमृत, निकली भांग’ असे काहीसे दुखणे महाराष्ट्राच्या मतदार जनतेचे झाले. त्यांना कुणाची सत्ता हवी होती, कुणाचे प्रशासन हवे होते, याचा कणभर आणि क्षणभरही विचार न करता दुसर्‍याच लोकांनी सत्ता बनविली. त्यामुळे मुक्या जनावरांसारखी महाराष्ट्राच्या जनतेवरही सत्ता लादली गेली. मतदारांच्या इच्छेला सरळ सरळ कात्रजचा घाट दाखविण्यात आला, त्यामुळे जनतेला हाकावेच लागत आहे. असो. तर मुद्दा होता की ते म्हणाले की, मी २०५० सालीही मुख्यमंत्री असेन. पण, मग तेव्हा त्यांचे बाळराजे कोण असतील? हं. पण, त्यांची काळजी, चिंता करण्याची गरज नाही. कारण साहेबांनी आधीच म्हटले आहे की, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी.’ मात्र, त्यावेळी आताचे कार्यकर्ते काय करत असतील? आता काही लोक म्हणतील की, तुम्हाला का चिंता? तर चिंता यासाठी की आताचे कार्यकर्ते हे स्वर्गीय बाळासाहेबांना मानणारे आहेत. त्यामुळे ‘बेस्ट सीएम’चे वर्चस्व ते सहन करतात. पण, आता २०२० साली जन्मलेले जे बालक असतील ते २०४५-२०५० तसे तरुण असतील. हे तरुण अणि त्यांच्या मागची पिढी आणि या मागच्या पिढीच्याही मागची पिढी आज राजकारणात सक्रिय आहे. आवाज कुणाचा म्हटल्यावर यांच्यात चेतना येते. मग या तीन पिढीच्या कार्यकर्त्यांनी काय करायचे? मोर्चा-आंदोलनाला बस भरत राहायची. या कार्यकर्त्यांना याबाबत काहीच का वाटत नाही? काही लोक म्हणतात, वाटल्यावर फक्त फक्त चटणी होते. योग्य कार्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षी भावनांची आणि इच्छांची वाटून वाटून अशीच चटणी झाली आहे. त्यामुळे साहेबांनी २०५० ऐवजी ३०५० ही म्हटले तरी कुणीही काही म्हणणार नाही.
 
 
सरल पोर्टलचे असरलत्व
 
 
तंत्र्य, समता आणि बंधुतायुक्त समरसतेचा भाव, या महाराष्ट्राच्या मातीतच आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या काय सुरू आहे? तर महाराष्ट्रात सध्या राज्य सरकारकडून जातीपातीचे राजकारण सुरू आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, ‘सरल पोर्टल.’ सरल पोर्टल हे सरकारचे आहे. राज्य सरकारच्या या पोर्टलवर विद्यार्थ्यांची माहिती नोंद केली जाते. यात विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, वय आणि जात, असे रकाने असायचे. पण, आता महाविकास आघाडीच्या महा महा पुरोगामी सरकारने यात जात म्हणून दोन वर्गवारी केली आहे. यात ब्राह्मण आणि इतर असा उल्लेख आहे. याबाबत भारताचे अखंडत्व टिकवू इच्छिणार्‍या आणि समाजात एकता नांदायला हवी, असे वाटणार्‍या अनेकांनी खेद आणि संताप व्यक्त केला आहे. ही गोष्ट दिसते तितकी छोटी आहे का? तर मुळीच नाही. कारण यातून विद्यार्थ्यांच्या किंवा या पोर्टलला भेट देणार्‍यांच्या मनात हे उमटू शकते की, ब्राह्मण इतरांपेक्षा वेगळे आहेत. ब्राह्मण समाजामध्ये आणि इतर सर्व समाजामध्ये फरक आहे. यावर संबंधितांचे महणणे आहे की, ही चूक लक्षात आल्यावर ती दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे. अनपेक्षितपणे ही चूक झाली आहे. आता ज्यांना सरकारी पोर्टलचे काम कसे चालते त्यांना माहिती आहे की, पोर्टलवर काय असावे, काय नाही, याबाबत चर्चा-बैठका झडतात. मत घेतली जातात. ‘आले माझ्या मना आणि आपली आवड’ म्हणून इथे काही करत नाहीत. मग सरल पोर्टलवर हे का व्हावे? पण, समाजचिंतकांच्या मते हे चुकून नसावे. हिंदू समाजाला कायम गटातटात विभागून ठेवले की, मतांचे आयते लोणी आपोआप पदरात पडते, यावर विश्वास असणारे यात नक्कीच सक्रिय आहेत. ब्राह्मण कुणी परके आहेत का? घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे म्हणणे धुडकावून लावले होते. सगळा समाज जातभेद विसरून एक व्हावा, असे त्यांचे मत. बाबासाहेबांच्या नावाने सत्तेची फळे चाखणार्‍या वर्षा गायकवाड सध्या शिक्षणमंत्री आहेत. मात्र, त्यांच्याच कार्यक्षेत्रात बाबासाहेबांच्या विचारांना हरताळ फासला गेला; अर्थात सगळे काही सत्तेसाठी अशी मनोवृत्ती असलेल्या नेत्यांकडून कसलीच अपेक्षा नाही.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@