#covid19UK भारतातील परिस्थिती काय?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2020
Total Views |

india_1  H x W:


ब्रिटनमध्ये सध्या कोरोनाच्या दुसऱ्या विषाणूने थैमान घातलंय. त्यामुळे पुन्हा एकदा जगभरातील देश विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी कडक निर्बंध आखण्याच्या तयारीत आहेत.अनेक देशांनी यूकेमधून येणाऱ्या विमान प्रवासावर बंदी घातली आहे. भारत सरकारने याबाबत घेतलेले निर्णय आणि विषाणूचा धोका याचा घेतलेला आढावा...


नवा कोरोना विषाणू


एकीकडे कोरोना लसीची आतुरता शिगेला पोहोचलेली असताना देशातील कोरोना आकडेवारी कमी होताना दिसत आहे. मात्र, महामारीचा काळ अद्यापही संपलेला नाही. ब्रिटनमध्ये लसीकरण सुरू झाल्यानंतरही कोरोना विषाणूत म्यूटेशन म्हणजेच नवा विषाणू दिसून आला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलंय की, विषाणूच्या नव्या प्रजातीविषयी ठोस अशी माहिती नाहीये. पण, यामुळे कोरोनाची लागण होते आणि पहिल्यापेक्षा ७० टक्के अधिक वेगानं त्याचा प्रसार होतो.यावरून कोरोना व्हायरसची ही नवी प्रजाती किती वेगानं पसरतेय याचा तुम्हालाही अंदाज येईल.ही नवीन प्रजाती इंग्लंडमध्ये सगळीकडे आढळून आली आहे. पण, लंडनमध्ये अधिकाधिक रुग्णांमध्ये ती आढळलीय.


दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये ३० डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन


पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लंडन आणि दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये ३० डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर केलाय. नवा विषाणू हा पूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा अधिक वेगाने पसरतो असे दिसून आले आहे.त्यामुळं आता जगातील सर्वच देशांसमोर नवं आव्हान निर्माण झालंय. ब्रिटनमध्ये कोरोना महामारी नियंत्रणाबाहेर जात असल्याचं आरोग्य सचिव मॅट हॅनकॉक यांनी मान्य केलंय. नाताळ आणि नववर्षाच्या पूर्वीच ही परिस्थिती उद्भवल्याने ब्रिटनमधील नागरिकांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.त्यामुळे लाखो नागरिकांवर पुन्हा एकदा घरातच थांबवण्याची वेळ आली.वेळीच सावध होत अनेक देशांनी ब्रिटनला जाणारी विमानं रद्द केली आहेत.नेदरलँड्सने ब्रिटन दरम्यान सुरू असणाऱ्या विमान सेवेवर या वर्षाखेरपर्यंत बंदी घातली आहे. तर, बेल्जिअमने २४ तासांची बंदी घातली आहे. त्याशिवाय बेल्जिअमने ब्रिटनसोबतची रेल्वे सेवाही स्थगित केली आहे. तर दुसरीकडे जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रिया, इटली यांनीदेखील ब्रिटनसोबतची विमान सेवा स्थगित केल्याची घोषणा केली आहे. तर, खबरदारीची उपाययोजना म्हणून सौदी अरेबियाने आपली सागरी आणि हवाई सीमा बंद केली आहे. ब्रिटनमध्ये नव्या प्रकारचा करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी युरोपीय संघातील देश चर्चा करणार असल्याचेही सांगितलं आहे.


कोरोनाच्या नव्या विषाणूंवर कोरोना लस प्रभावी ठरेल?


तर याच प्रश्नाचं उत्तर आता शास्रज्ञ शोधत आहेत. ब्रिटीश शास्रज्ञांच्या म्हणण्यानुसार नवीन कोरोना स्ट्रेनवर सध्याची कोरोना लस प्रभावी ठरेल. ही लस लोकांची प्रतिकारशक्ती वाढवणार आहे. त्यामुळं कोरोनाचा सामना ते सहजरितीने करु शकतात. मात्र, कोरोनाचे नवनवे स्ट्रेन येत राहिले तर ती डोकेदुखी ठरु शकते असंही तज्ज्ञांचं मत आहे. या विषाणूचा वेगाने संसर्ग होण्याची शक्यता असल्याने सार्वजनिक ठिकाणी अधिक काळजी घेण्याचे आवाहन इंग्लंडचे मुख्य चिकित्सा अधिकारी क्रिस व्हिटी यांनी केले.ब्रिटन सरकारकडून कोरोना विषाणूच्या स्वरुपाविषयी जागतिक आरोग्य संघटनेला माहिती देण्यात आली आहे. तर आम्ही ब्रिटनच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून नवीन विषाणू संदर्भातील विश्लेषण आणि चालू असलेल्या संशोधनाची माहिती ब्रिटनकडून घेत असल्याचे व यासंदर्भात लोकांना अद्यायावत करण्याचे काम आम्ही करत आहोत असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

भारतातील स्थिती काय ?

या नव्या कोरोना व्हायरसमुळे भारतातही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज आपत्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर केंद्र सरकारने ब्रिटनहून येणाऱ्या आणि ब्रिटनला जाणाऱ्या सर्व विमानसेवा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या (स्ट्रेन) संसर्गाबाबत सरकार सतर्क असून घाबरून जाण्याची गरज नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. २२ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत कुठलीही फ्लाईट युकेसाठी उड्डाण घेणार नाही, एअर इंडियाचा ट्वीट करत माहिती, लंडनहून आलेले पाच जण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं आढळून आले, त्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने निर्णय घेतला आहे.
@@AUTHORINFO_V1@@