नरेंद्र मोदींचा अमेरिकेच्या सर्वोच्च 'लिजन ऑफ मेरिट' पुरस्काराने गौरव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2020
Total Views |

america_1  H x



वॉशिंग्टन :
अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाता जाता मोदी यांना 'लिजन ऑफ मेरिट' हा अमेरिकेतील सर्वोच्च सन्मान देऊन गौरवले आहे. अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी या पदकाचा स्वीकार केला. अमेरिकेने मोदींना हा सर्वोच्च पुरस्कार दिल्याने त्यांच्या निर्विवाद नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले आहे.


अमेरिका आणि भारत यांच्या रणनीतीच्या दृष्टीने संबंध अधिक कणखर केल्याबद्दल आणि भारताला जागतिक ताकद म्हणून पुढे आणण्यासाठी हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आला आहे.पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, "अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंह सिंधू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे हा पुरस्कार स्वीकारला. तरनजीत सिंह सिंधू यांना व्हाईट हाऊसमध्ये हा पुरस्कार अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी दिला." अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी व्हाईट हाऊसमध्ये भारतीय राजदूत तरणजीत सिंग संधू यांच्याकडे हे पदक सोपवले. राष्ट्रपती ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिकेचे संबंध मजबूत करण्यावर भर दिल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'लिजन ऑफ मेरिट' हे पदक बहाल करण्यात आले आहे, असे ओब्रायन यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे. लिजन ऑफ मेरिट हा पुरस्कार अमेरिकेतील सर्वोच्च पुरस्कार आहे. चीफ कमांडर श्रेणीचा हा पुरस्कार असून तो केवळ एखाद्या देशाच्या सरकारला किंवा एखाद्या देशाच्या प्रमुखांनाच दिला जातो.

भारताला जागतिक महाशक्ती म्हणून नावारुपाला आणण्यासाठी मोदींना हा पुरस्कार दिला आहे. शिवाय त्यांच्या मजबूत नेतृत्व क्षमतेसाठीही या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अमेरिका आणि भारताचे संबंध मजबूत करण्यावर भर दिला होता. त्याची दखलही हा पुरस्कार देताना घेण्यात आली आहे. या पुरस्काराने मोदींसह ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जापानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनाही गौरवण्यात आले आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात या देशांच्या प्रतिनिधींनी या पुरस्काराचा स्वीकार केला. हिंद प्रशांत क्षेत्रात मुक्त व्यापार करण्यास प्रोत्साहन दिल्यामुळे शिंजो आबे यांना तर संयुक्त सुरक्षा आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी मॉरिसन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.ऑस्ट्रेलिया आणि जपानच्याही राजदूतांनीच त्यांच्या त्यांच्या पंतप्रधानांतर्फे हा पुरस्कार स्वीकारला.याआधीही म्हणजे मोदींचे असे गौरव झाले आहेत. २०१६साली सौदी अरेबिया, २०१९ साली यूएई आणि २०१९ सालीच रशिया, मालदीव या देशांनी आपला सर्वोच्च पुरस्कार देऊन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव केला आहे.
@@AUTHORINFO_V1@@