‘नंदनवना’त भाजपचा दबदबा कायम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2020
Total Views |

jk ddc_1  H x W
 
 
 
 
 
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा दबदबा कायम असल्याचे सिद्ध झाले आहे. डीडीसी निवडणुकीमध्ये (आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार) भाजपला ७५ जागांवर आघाडी मिळाली होती, तर सात पक्षांची आघाडी असलेल्या गुपकारला १०३ जागांवर आघाडी मिळाली होती. काँग्रेसला २४, तर अपनी पार्टीला १० आणि अपक्ष उमेदवारांना ६६ जागांवर आघाडी मिळाली होती. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरु होती.
 
 
 
 
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ संपुष्टात आणल्यानंतर जिल्हा विकास परिषदेच्या २८० जागांसाठी आठ टप्प्यांमध्ये मतदान पार पडले होते. निवडणुकीत ५७ लाख मतदारांनी जवळपास ५१ टक्के मतदान केले होते. विशेष म्हणजे, आतापर्यंत काश्मीर खोऱ्यात यश मिळणाऱ्या भाजपचे कमळ यावेळी येथे तीन जागांवर फुलले आहे. त्यामुळे पुढील काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसाठी हा विजय मनोबल वाढविणारा ठरणार आहे. काश्मीर खोऱ्यात एकेकाळी दहशतवादाच्या छायेत असणाऱ्या बांदीपोरा, काकापोरा आणि बलहामा येथे भाजपला मिळालेले यश अतिशय महत्त्वाचे आहे.
 
 
डीडीसी निवडणुकांचे वैशिष्ट्य म्हणजे फारुख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स, मेहबुबा मुफ्ती यांचा पीडीपीसह सात पक्षांनी एकत्र येऊन गुपकार आघाडी स्थापन केली होती. त्यामुळे निवडणुकीत भाजप, सात पक्षांची गुपकार आघाडी, काँग्रेस आणि अपना पार्टी असा चौरंगी सामना झाला. भाजपने या निवडणुकीत आपली संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. केंद्रीय मंत्री मुख्तार आब्बास नक्वी, भाजपचे ज्येष्ठ नेते शाहनवाझ हुसैन, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह, अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर, खासदार जफर इस्लाम, तरुण चुग आदी नेते काश्मीरमध्ये सक्रिय होते.
 
 
 
नवा पर्याय देण्यास भाजप यशस्वी
 
 
भाजपला रोखण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, डाव्या पक्षांसह सात पक्षांनी एकत्र येऊन गुपकार आघाडी स्थापन केली आहे. डीडीसी निवडणुकीत जरी गुपकार आघाडीला यश मिळाल्याचे दिसत असले तरीही काश्मीरमध्ये नवा पर्याय देण्यास भाजपला यश आले आहे. त्याचप्रमाणे डीडीसी निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्यास अडचण असलेल्यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यास मदत केल्याचेही माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये यापुढील काळात भाजप राजकारणाच्या केंद्रस्थानी राहण्याची सुरुवात झाल्याचे सांगता येते.




@@AUTHORINFO_V1@@