अभाविपचे ६६ वे राष्ट्रीय अधिवेशनचे रा.स्व.संघाचे भैयाजी जोशी यांच्याहस्ते उद्घाटन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2020
Total Views |

Thane_1  H x W:
 
 
 
 
ठाणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे यंदाचे ६६ वे राष्ट्रीय अधिवेशन नागपूर येथे २५ व २६ डिसेंबर या कालावधीत आयोजीत केले आहे. रेशीम बागेतील स्मृती मंदिर परिसरात होणाऱ्या या अधिवेशनाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्याहस्ते होणार आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन होत असल्यामुळे केंद्रीय कार्यसमिती सदस्य तसेच,विविध प्रदेशाचे मंत्री व संघटनमंत्री असे देशभरातुन सुमारे दोनशे प्रतिनिधी प्रत्यक्ष स्वरूपात उपस्थित राहणार असुन देशभरातील चार हजार ठिकाणाहून वीस लाखाच्यावर विद्यार्थ्यी ऑनलाइन स्वरूपात सहभागी होणार आहेत.दरम्यान, ठाणे व पालघर जिल्ह्यातुन सुमारे ५०० विद्यार्थी कार्यकर्ते ऑनलाईन सहभाग घेणार आहेत.अशी माहिती मंगळवारी अभाविप ठाणे विभागाने आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.यावेळी अभाविपचे कोकण प्रांत उपाध्यक्ष प्रा.मारुती शेळके,कोकण प्रांतमंत्री प्रेरणा पवार,ठाणे जिल्हा संयोजक अभिषेक माने आदी उपस्थित होते.
 
 
नागपुर येथील हे राष्ट्रीय अधिवेशन प्रत्येक तालुक्यामध्ये २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ३ ते ७ या वेळेत ऑनलाईन स्वरुपात होणार आहे. अधिवेशनामध्ये शैक्षणिक धोरण,सामाजिक स्थिती, शेतकरी कायदा अशा विषयावर प्रस्ताव पारित होणार आहेत.तसेच,तरुणांना स्थायी जैविक आणि बहु प्रचलित शेती मॉडेलकडे आकर्षित केल्याबद्दल आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण रोजगारासाठी काम केल्याबद्दल बिहारचे मनिष कुमार यांना २०२० सालचा प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्कार या अधिवेशनामध्ये दिला जाणार आहे.
 
 
अभाविपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डॉ.छगनभाई पटेल आणि पुनर्निर्वाचित राष्ट्रीय महामंत्री सुश्री निधी त्रिपाठी अधिवेशनामध्ये कार्यभार स्वीकारतील.प्रा. पटेल हे गुजरात येथील मेहसाना जिल्ह्यातील असून त्यांनी फार्मसी विषयात आचार्य पदवी प्राप्त केली आहे.आत्तापर्यंत त्यांचे १७० हुन अधिक शोधपत्र (रिसर्च पेपर) प्रकाशित झाले असुन १२ वर्षापूर्वी प्रसिद्ध फार्मा व्हीजनच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये संवाद घडवून आणले.१९९६ पासून ते परिषदेच्या संपर्कात आहेत.तर,निधी त्रिपाठी या मूळ उत्तर प्रदेश येथील प्रतापगड येथील असून,त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून बीए तर,जेएनयु विद्यापीठातून एम ए, एमफिल नंतर पीएचडीचे शिक्षण सुरू केले आहे.२०१७ मध्ये जेएनयु विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून त्यांनी अभाविपचे प्रतिनिधित्व केले.तसेच अभाविपच्या मिशन साहसी अभियानाला अखिल भारतीय स्वरूप देण्यामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.वर्ष २०१८ मध्ये भारत सरकारच्या क्रीडा व युवा मंत्रालयांतर्गत आयोजित श्रीलंका यात्रेचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@