भाऊ! 'थर्टी-फस्ट' ११ च्या आत आटपायचा, अन्यथा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Dec-2020
Total Views |
RAINA_1  H x W:
 
 


यंदाचा थर्टीफर्स्ट नेहमीसारखा नाही, सहकार्य करा : इकबाल सिंह चहल


मुंबई : यंदाचा थर्टीफर्स्ट नेहमीसारखा नाही, त्यामुळे जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केलं आहे. चहल म्हणाले, "थर्टीफर्स्टला हॉटेल, पब, रिसॉर्टमध्ये ज्या कुठल्या पार्टी करायच्या असतील, त्यांना रात्री ११ पर्यंतच परवानगी आहे. विवाह सोहळे, वाढदिवस पार्टी आणि नवीन वर्षाची पार्टी ११ वाजतापूर्वीच आटोपून घ्यायचे, असे निर्देश चहल यांनी दिले आहेत.
 
 
पार्टी करायचा विचार करताय ?
 
 
जर तुम्ही २०२० वर्षाला निरोप द्यायला म्हणून घराबाहेर पडायचा किंवा पार्टी करायचा विचार करत असाल तर पालिकेने आखून दिलेले काही नियम आहेत. त्यानुसार खबरदारी बाळगली नाहीत तर कारवाई होणार आहे. राज्य सरकारने बुधवार दिनांक २३ डिसेंबरपासून ५ जानेवारीपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे.
 
 
काय आहे नियमावली
 
 
मुंबईत रात्री ११ ते पहाटे ६ या वेळात ही संचारबंदी होणार आहे. आणि हा नियम ५ जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे. कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी कोरोना संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. मुंबईत नाईट क्लब, पब, रेस्टॉरंट यांच्यामध्ये रात्रीबेरात्री सुरू असलेल्या धिंगाण्यावर सरकारचा आक्षेप आहे. मुंबईत कोरोना प्रतिबंधाचे नियम तोडून मध्यरात्रीनंतरही धुमाकूळ घालणाऱ्या ३४ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुंबई विमानतळाजवळ असलेल्या ड्रॅगनफ्लाय पबमध्ये एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये सुझान खान, सुरेश रैना, गुरू रंधवा यांच्यासह अन्य काही सेलेब्रिटीही उपस्थित होते.
 
 
दहीहंडीच्या काळात नागरिकांनी बाळगली सतर्कता
 
 
मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सोमवार, दि. २१ डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेतली होती. ते म्हणाले , “महापालिकेच्यावतीने तीन आठवड्यापासून ‘ब्रीफिंग’ करण्यात येत आहे. मात्र, काही मुंबईकर हे लक्षात घेत नाही. गेल्या शनिवार-रविवारीसुद्धा काही लोक नियमावली मोडून एकत्रितपणे ‘नाईट क्लब’मध्ये आढळून आले. त्यामुळे नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागत आहे,” असे ते म्हणाले. “दहीहंडी, गणेशोत्सव, दसरा, ईद, दिवाळी हे सण नेहमीप्रमाणे नव्हते. या सणांमध्ये नागरिकांनी सतर्कता बाळगली.
 
यंदाचे वर्ष नेहमीप्रमाणे साजरे करता येणार नाही
 
 
नाताळ आणि नववर्ष अभिनंदन हे नेहमीप्रमाणे असणार नाहीत. मोठी सतर्कता बाळगावी लागणार आहे. यावेळी उगाचच गर्दी करणार्‍यांवर पोलीस कारवाई करतील आणि महापालिका त्यांना सहकार्य करेल,” असेही आयुक्त म्हणाले.
नाईट कर्फ्यू म्हणजे सगळं बंद का?
 
 
नाईट कर्फ्यूमध्ये संपूर्ण लॉकडाऊन असेल का, असा प्रश्न सर्वांनी उपस्थित केला आहे. तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. 'नाईट कर्फ्यू’ म्हणजे चार-पाच जणांहून अधिक लोकांनी जमावाने फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. लोकांनी त्यांच्या नियमित कामासाठी बाहेर पडण्यास हरकत नाही. तसेच टॅक्सी-रिक्षामधून कामासाठी फिरण्यास मज्जाव नाही. तसेच, रेल्वे आणि बससेवाही सुरूच राहणार आहे. परंतु, उगाचच गर्दी करून कोरोना फैलावण्यास कारण ठरणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
 
 
ब्रिटनमध्ये आढळला नवा कोरोना विषाणू
 
 
संचारबंदी केवळ मुंबईत होणे नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा होणे आहे. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याने तेथे ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे ब्रिटनहून मंगळवारी रात्री २, बुधवारी सकाळी ६, दुपारी ११ आणि रात्री ११ वाजताच्या दरम्यान एक अशा पाच विमानांना मुंबईत उतरण्यास परवानगी देण्यात आली आहे. या विमानातील प्रवाशांना ‘सेव्हन हिल्स’ रुग्णालयात ‘क्वारंटाईन’ करण्यात येणार आहे. ब्रिटनवगळता युरोपातील इटली, फ्रान्स, जर्मनी, स्पेन व मध्य-पूर्व इतर देशांतून येणार्‍या विमानातील प्रवाशांना जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. त्यांची ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात येणार असून लक्षणे असलेल्यांना उपचार करण्यात येतील, तर लक्षणे नसलेल्यांची पाचव्या व सातव्या दिवशी तपासणी करण्यात येणार असून ‘निगेटिव्ह’ असल्यास त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.
 
 
चर्चमध्ये रात्री ८ वाजता सामुहीक प्रार्थना
 
नाताळच्या सणाला आदल्या दिवशी म्हणजे २४ डिसेंबरला रात्री चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना केली जाते. परंतु यावेळी कोरोनामुळे आणि या नियमांमुळे रात्री ८ वाजताच प्रार्थना केली जाणार आहे तर २५ तारखेला सकाळी प्रार्थाना केली जाणार आहे. तुम्ही सुद्धा जर ३१ डिसेंबर ला बाहेर पडायचा विचार करत असाल तर हे नियम विसरू नका. घरी रहा, सुरक्षित रहा, असा सल्ला पालिका प्रशासनाने दिले आहेत.
 
नाइट कर्फ्यू जाहीर होऊनही पबमध्ये धिंगाणा : सेलिब्रिटींना अटक
 
 
 
कोरोना प्रतिबंधासाठी अनलॉक जाहीर होताच बोकाळलेल्या स्वैराचाराला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने मुंबईसह राज्यभरात महानगरपालिका क्षेत्रात रात्र संचारबंदी जारी केली असली तरी सेलिब्रिटींचा धुमाकूळ थांबलेला नाही. अशाच प्रकारे मुंबईत कोरोना प्रतिबंधाचे नियम तोडून मध्यरात्रीनंतरही धुमाकूळ घालणाऱ्या ३४ जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
 
 
विमानतळानजीक ड्रॅगनफ्लाय पबमध्ये पार्टी
 
मुंबई विमानतळाजवळ असलेल्या ड्रॅगनफ्लाय पबमध्ये एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये सुझान खान, सुरेश रैना, गुरू रंधवा यांच्यासह अन्य काही सेलेब्रिटीही उपस्थित होते. सहभागी झालेल्या व्यक्तींनी कोरोनासंबंधी नियमांकडे कानाडोळा केल्याचा आरोप आहे. या पार्टीत अनेकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवलेच, मात्र उपस्थितांपैकी कोणी मास्कही लावले नसल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे हा पब नियोजित वेळेच्या पलीकडे खुला ठेवण्यात आला होता.
 
 
पोलीसांनी मारला मध्यरात्री छापा
 
 
पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मध्यरात्री साडेतीन वाजताच्या सुमारास ड्रॅगनफ्लाय पबवर छापा टाकला. त्यावेळी अनेकांनी मागच्या दाराने पळ काढला. मात्र पुकारण्यात आलेल्या रात्र संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडे माहिती देणे पब मालकाला भाग पडले. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रैना-सुझानसह पब मालकावरही कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिसांनी रैनावर गुन्हा दाखल केला.

रात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलीसांचा 'वॉच'
मुंबईत कोरोना आटोक्यात आला असला तरी संपलेला नाही. त्यातच इंग्लंडमध्ये कोरोनाच्या विचित्र विषाणूने अनेकांना संसर्ग केल्याने तेथे पुन्हा लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर लंडनहून येणाऱ्या विमानांना मंगळवार (दि. २२) रात्रीपासून मुंबईत उतरण्यास बंदी करण्यात आली आहे. मात्र एवढी खबरदारी घेऊनही सेलिब्रिटींचा धिंगाणा चालूच आहे. सामान्य मुंबईकरांसाठी तो घातक ठरणार आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत कारवाई केली. दरम्यान रात्र संचारबंदी जारी करण्यात आली असली तरी पोलिकेची पथकेही नाईट क्लब, पब आणि रेस्टाँरण्टवर नजर ठेवून आहेत. पालिकेची पथके नियमितपणे तपास करत आहेत, असे पालिकेकडून सांगण्यात आले.




@@AUTHORINFO_V1@@