आपल्याच सरकारविरोधात राष्ट्रवादीचे नगरसेवक कोर्टात?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2020
Total Views |
Thane NCP_1  H
 
 

ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

 
ठाणे : कोरोनाच्या प्रादुभावामुळे विधीमंडळ व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सभा, बैठका वेबिनावर घेतल्या जात होत्या. मात्र,२१ डिसेंबर रोजी शासनाने स्थायीसह वैधानिक समित्यांच्या सभा प्रत्यक्ष घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती व वैधानिक समितीच्या सभा व बैठकाही प्रत्यक्ष घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी केली आहे.
 
 
 
या निर्देशानुसार महासभा देखील प्रत्यक्ष घेतील, अशी आशा असल्याचे सांगितले. अन्यथा पुन्हा एकदा उच्च न्यायालयाचे दार ठोठवावे लागेल, असा इशाराही जगदाळे यांनी दिल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी कॉंग्रेसनेच शासनाच्या निर्देशाबाबत शंका व्यक्त केली आहे.
 
 
ठाणे महापालिकेची सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष घेण्यात यावी.या मागणीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत जगदाळे यापूर्वी उच्च न्यायालयात गेले होते. त्यावर न्यायालयाने सभा नियमानुसार वेळेवर वेबिनारवर न घेता प्रत्यक्ष घेण्याचा निर्णय दिला होता. तेव्हा ठाणे मनपा प्रशासनानेही याबाबत अनुकुल व्हावे. अन्यथा प्रत्यक्ष महासभेसाठी पुन्हा एकदा उच्च न्यायालयाचे दार ठोठवावे लागेल, असा इशाराही जगदाळे यांनी दिला आहे.




@@AUTHORINFO_V1@@