कोरोना लसीवर इस्लामिक धर्मगुरुंचा आक्षेप, हे आहे कारण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2020
Total Views |
Covid _1  H x W
 
 


जकार्ता : कोरोनाशी झुंज सुरू असताना तसेच लसीकरण मोहिम प्रगतीपथावर असताना आता इस्लामिक देशांनी यावर विवाद सुरू केला आहे. इस्लामिक लॉ कोरोना लसीकरणाला मंजूरी देतो का ?, असा प्रश्न विचारला जात आहे. या सर्व वादांवर कोरोना लस उत्पादनाची पद्धत आहे. विषाणूला स्थिर करण्यासाठी डुकरांचे (पोर्क) जिलेटीनचा वापर केला जाणार आहे.
 
 
 
याद्वारे साठवणूक आणि वाहतूकीत लसीला सुरक्षित आणि परिणामकारक बनवून ठेवते. ही गोष्ट इस्लामिक देशांना खटकते आहे. त्यांच्या मते इस्लाममध्ये पोर्क आणि त्यापासून बनवलेल्या वस्तू वर्ज्य आहेत. त्याला हराम मानले जाते. त्यामुळे अशी कुठलीही लस इस्लामिक लॉनुसार, हराम मानले जाते.
 
 
 
इंडोनेशियाने मागितले हलाल प्रमाणपत्र
 
 
मुस्लीम जनसंख्या असलेल्या देशात लसीकरणात पोर्कचा वापर हा चिंतेचा विषय ठरत आहे. इंडोनेशिया सरकारने हलाल प्रमाणपत्रानंतरच कोरोना लसीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपन्यांना स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे की, पोर्क जिलेटीनचा वापर केलेला आहे की नाही.
 
 
कंपन्यांनी केला पोर्क मुक्त लस तयार करण्याचा दावा
 
 
कित्येक कंपन्यांनी मात्र पोर्क मुक्त लस तयार करण्याचा दावा केला आहे. फायझर, मॉर्डना आणि एस्ट्राजेनेका यांनी परिपत्रक जाहीर करत ही माहिती दिली आहे. लसीचा वापर कुणीही करू शकत नाही त्यासाठी मान्यता असायला हवी.
 
 
लसीकरणावर का होत आहे चर्चा ?
 
 
दरम्यान, अशी चर्चा ऑक्टोबरमध्ये सुरू झाली होती. जेव्हा इंडोनेशिअन राजकारणात आणि इस्लामिक धर्मगुरू कोरोना लसीकरणाची चर्चा करण्यासाठी चीनला पोहोचले होते. इंडोनेशियातील जनतेसाठी लसीकरणाचा करार करण्यासाठी हे सर्वजण पोहोचले होते. तिथे कोरोना लस कशी तयार होत आहे याबद्दल समजल्यावर इस्लाम धर्मगुरुंनी प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली.
 
 
 
जाणकारांचे मत काय ?
 
 
ब्रिटिश इस्लामिक मेडिकल असोसिएशनतर्फे जनरल सचिव डॉ. सलमान वकार यांच्या मते, यहूदी आणि मुस्लीमांशिवाय अन्य धर्म समुदायांमध्येही याबद्दल संभ्रम आहे.
@@AUTHORINFO_V1@@