ठाण्याच्या 'या' मॉलमध्ये घ्या ज्युरासिक अॅडव्हेंचरचा फिल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2020
Total Views |
KorumCalling_1  
 
 



ठाणे : नाताळनिमित्त कोरम मॉलमधे ज्युरासिक विंटर अॅडव्हेंचरची थिम साकारण्यात आली आहे. अनिमेट्रॉनिक्स टी- रेक्स ब्राचिओसॉरस, ट्रायसेराटॉप्स आदींनी सुसज्ज असा हा देखावा आता सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. आपले कुटुंबीय व मित्रपरिवारासोबत मजा लुटताना हा थरारक अनुभव तुम्ही घेऊ शकता.


सोबतच सेल्फी पॉईंटवर फोटोसेशनही करू शकता. हृदयाचा थरकाप उडवणारी ही दृश्य तुम्हाला कॅमेऱ्यात कैद केल्याशिवाय चैन पडणार नाहीत. आवडत्या ब्रँड्सवर असलेल्या आकर्षक ऑफर्स, वीकेंड सिनेमा आणि अनलॉक प्रक्रियेनंतर पहिल्यांदाच कुटूंबासोबत फिरण्याचा आनंद तुम्हाला येथे लुटता येणार आहे.
 
 
 



कोरम ज्युरासिक विंटर २०२० मधली ही साहसी मजा तुमची प्रतीक्षा करत आहे, अशी माहिती मॉल प्रशासनाने एका परिपत्रकाद्वारे दिली आहे. १० हजार रुपयांची खरेदी करा आणि ज्युरासिक विंटर पार्कमधून मस्त फेरफटका मारा. पाच हजार रुपयाच्या खरेदीवर १ वर्षाची विनामूल्य खरेदी जिंकण्याची संधी, तसेच सुट्ट्यांच्या हंगामात या धमाल साहसासह मजा मस्ती करण्यासाठी आम्हाला भेट द्या!, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


कधी: १८ डिसेंबर २०२० ते ३ जानेवारी २०२१

वेळ: दुपारी १२ ते रात्री ८, सर्व दिवस


कुठे: कोरम मॉल, ठाणे
@@AUTHORINFO_V1@@