शक्ती सकारात्मकतेची...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Dec-2020
Total Views |

Manovata_1  H x
 
तुम्ही दिसायला सुंदर किंवा राजबिंडे नसाल किंवा पैशाने श्रीमंत नसाल, पण जर तुमचे विचार व तत्त्वे ही चांगली असतील व तुम्ही तुमच्या संस्कृतीला धरुन वाटचाल करत असाल, तर तुमचे व्यक्तिमत्त्व सूर्याप्रमाणे तळपते व तुम्ही शरीराने व मनाने निरोगी होत असता.
 
 
डॉ. हॅनेमान यांनी होमियोपॅथीच्या ग्रंथसंपदेत एक वाक्य लिहून ठेवलं आहे ते म्हणजे, "Bacteria is not cause, but the result of the disease." म्हणजेच काय तर जीवाणू किंवा विषाणू हे आजाराचेमूळ नसून आजाराचा अंतिम परिणाम आहेत. याच वाक्याचा जर नीट अभ्यास केला तर त्यांना असे समजावून सांगायचे आहे की, बॅक्टेरिया काय किंवा व्हायरस काय, हे शरीरामध्ये केव्हाही प्रवेश करु शकतात! तर ज्यावेळी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही कमकुमत झालेली असेल तरच म्हणजेच काय तर रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होणे हीच आजाराची सुरुवात आहे व त्यानंतर येणारे बॅक्टेरिया व व्हायरस हे संधीसाधू जंतू आहेत, जे आधीच कमकुवत झालेल्या आपल्या शरीराला आपले भक्ष्य बनवतात. त्यामुळे मूळ आजार शोधून काढायचा असेल तर आपल्याला ज्या कारणांमुळे रोगप्रतिकारक शक्ती व चैतन्यशक्ती कमकुवत होते, त्या कारणांची मीमांसा करणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण निरोगी मन व सकारात्मक विचारसरणी याबद्दल बोलत आहोत. जसे आपण पाहिले की, मानवाला दिलेली बुद्धी ही परमेश्वराने दिलेले एक वरदानच आहे, तर या वरदानाचा उचितप्रकारे वापर करणे हे फार महत्त्वाचे व उपयुक्त असे साधन आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण आपल्या विचारांची दिशा बदलू शकतो. आपल्या बुद्धीच्या जोरावर आपण आपल्या आयुष्यातील तत्त्वे जी फार महत्त्वाची असतात, ती जपू शकतो. मित्रांनो, लक्षात ठेवा रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी मन, बुद्धी व चैतन्यशक्ती यांची सकारात्मक युती होणे हे फार गरजेचे असते. त्याचबरोबर सकस आहार व नियमित व्यायाम करणे हेदेखील अत्यंत आवश्यक असते, नियमित व्यायाम म्हणजे वजने उचलणे, जोर-बैठका काढणे असे नाही, तर नियमित चालायला गेले, तरीसुद्धा शरीराला व्यवस्थित व्यायाम मिळतो.
 
 
सकारात्मक विचार-बुद्धीच्या जोरावर आपण आपलेच नव्हे, तर इतरांचेही आयुष्य सुंदर बनवू शकतो. तुम्ही दिसायला सुंदर किंवा राजबिंडे नसाल किंवा पैशाने श्रीमंत नसाल, पण जर तुमचे विचार व तत्त्वे ही चांगली असतील व तुम्ही तुमच्या संस्कृतीला धरुन वाटचाल करत असाल, तर तुमचे व्यक्तिमत्त्व सूर्याप्रमाणे तळपते व तुम्ही शरीराने व मनाने निरोगी होत असता. आयुष्यात येणारे ताण-तणाव व त्यामुळे मनात तयार होणारी भीती व भयगंड याच्यामुळे शरीरातीलपेशींची हानी होते. शरीरात अ‍ॅड्रिनॅलीन, (Adrenaline) तसेच सिरोटोनीन (Serotonin) डोपामीन (Dopamine) सारखी द्रव्ये पाझरत असतात व त्यामुळे आपल्या शरीरातील पेशीवर व कृतींवर व पर्यायाने विविध संस्थांवर त्याचा परिणाम होताना दिसून येतो. ‘कोविड-१९’च्या काळातही या भयगंडामुळे व अनामिक भीतीमुळे शरीरातील विविध संप्रेरके व स्राव यामध्ये असमतोल निर्माण झाला व पर्यायाने लोकांची रोगप्रतिकारक शक्ती आणखीनच ढासळली आणि या ढासळलेल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळेच हे लोक पटापट कोविडच्या संसर्गाला बळी पडले. यापुढे आपण पाहूया की, सकारात्मक कसे वागावे.
- डॉ. मंदार पाटकर

 
@@AUTHORINFO_V1@@