मुकुंदराव वझे यांच्या गुणांचे अनुकरण हीच खरी श्रद्धांजली!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2020
Total Views |
vaze1 _1  H x W
 
 



कल्याण : 'संघाचे काम करताना ध्येयाचा विचार केला पाहिजे. व्यक्तीचा विचार करू नये. समाजात कार्यकर्ता म्हणून वावरताना काही गुण असणे आवश्यक असते. दैनंदिन जीवनात गुणांचे प्रकटीकरण होते. त्यावेळी समाजात ही एक वेगळा गुण तयार होऊन समाजावर चांगला परिणाम होतो. संघाचे विचार आणि शिकवण तंतोतत मुकुंदराव वझे यांच्यात होती. वझे यांनी अनेक कार्यकर्ते घडविले. सामान्य घरातील एखादा कार्यकर्ता असामान्य होतो. वझे यांच्यातील गुणांचे अनुकरण केल्यास तीच त्यांना जन्मशताब्दी निमित्त खऱ्या अर्थाने श्रध्दाजंली ठरेल,' असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांताचे सहकार्यवाह शरदराव ओगले यांनी व्यक्त केले.
 
 
 
छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याण येथील दिवंगत शिक्षक, विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनसंघाचे प्रचारक कै. मुकुंदराव विष्णू वझे यांच्या जन्मशताब्दी समारोहाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ओगले बोलत होते. हा कार्यक्रम कल्याण पश्चिमेतील कै. आनंदी गोपाळ सभागृह, अभिनव विद्यामंदीर येथे पार पडला. कै. मुकुंदराव वझे- तपस्वी वार्तासूत्र विशेषांकाचे प्रकाशन पार पडले. यावेळी व्यासपीठावर छत्रपती शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष व वाडा महाविद्यालयाचे प्राचार्य नारायणराव फडके, खासदार कपिल पाटील, कल्याण जिल्हा संघचालक डॉ. विवेक मोडक, आदी मान्यवर उपस्थित होते.
 
 
 
ओगले म्हणाले, "संघ कार्यकर्त्यांमध्ये कोणते गुण असावेत हे समर्थ रामदासांनी आपल्या काव्यातून सांगितले आहे. त्यामध्ये त्यांनी प्रत्येकाने प्रसंगानुसार आपले वर्तन ठेवले पाहिजे. अहंकाराला दूर ठेवा. माणसामध्ये अहंकार दिसला तर समाज आपल्यापासून दूर जाईल. मनातील भाव ओळखणारा कार्यकर्ता हवा. संघ कार्यकर्त्यांच्या आचरणांचा संपूर्ण समाजावर परिणाम होत असतात. कार्यकर्ता संघाच्या कामाला प्राधन्य देतो. स्वत: संस्कारित होतो. त्यामुळे समाज त्याप्रमाणो विचार करायला लागेल. संघ कामाची व्यूहरचना करताना स्थायीभाव, चिरकाल टिकणाऱ्या गोष्टीचा कार्यकर्ता विचार करीत असतो. शब्दाचा वापर जपून करतो. मातृभूमीच्या भक्तीसाठी अखंडपणो काम करीत असतो. सगळ्यांशी चांगले संबंध असावेत. एखाद्या गोष्टीचा उपाहास , उपेक्षा असतो तेव्हा आपले काम वाढत असते. हे गुण संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये असावेत."
 
 
 
 
"संघाच्या कामाचा परिणाम समोरील व्यक्तीच्या व्यवहारात, आचरणात होत असतो. अनेक कार्यकर्त्यांनी मुकुंदरावांना अनुभवले आहे. मुकुंदरावांनी आपल्या जीवनात संघाचे काम, नोकरी, कुटुंब आणि समाज या सगळ्या पातळीवर त्यांनी जबाबदारी पार पाडली. मुकुंदरावांनी स्वांतत्र्य मिळेर्पयत लग्न करणार नाही. हे ठरवून त्यांनी स्वातंत्र्य मिळेर्पयत संघ प्रचारक म्हणून काम पाहिले होते व नंतरच लग्न केले. राष्ट्राचे काम प्रथम हे त्यांनी यातून दाखविले होते," असे ही ओगले म्हणाले.
 
 
विवेक मोडक म्हणाले, "कोरोना काळात जन्मशताब्दी वर्षानिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पण सांस्कृतिक कार्यक्रमांना बंदी असल्याने अनेक योजना कागदावरच राहिल्या. छत्रपती शिक्षण मंडळांनी संधी साधली त्यामुळे त्यांचे कौतुक आहे. मुकुंदरावांना मी पाहिले नाही. तरीदेखील त्यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात मी बोलायला उभा आहे. गेली ९५ वर्ष संघगंगा अव्याहतपणो वाहते ती ज्येष्ठ कार्यकर्ता मुकुंदरावासारख्या व्यक्तीमुळे. त्यांनी लहान मोठे काम पाहिले नाही."
 
 
 
मुकुंदरावासारख्या कार्यकर्त्यामुळे संघाने जी जबाबदारी दिली ती स्वीकारली आणि तिला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. संघाचा कार्यकर्ता म्हणून काम करणो फार सोपी गोष्ट नाही. दिवसभरात आपण किती गोष्टी ठरवित असतो. त्यातील किती गोष्टींना दिवसभरात न्याय देतो याचे दडपण येत असते. पण तरीसुध्दा सामान्य कार्यकत्र्याला कोणत्याही गोष्टीचे दडपण घेत नाही. मुकुंदरावासारख्या कार्यकत्र्याचे दडपण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसमोर असते. चुकून माझ्या हातून कोणतीही डाग लागेल, अशी गोष्ट घडणार नाही हे दडपण संघ कार्यकर्त्यांवर असते. मुकुंदरावांच्या जन्मशताब्दीनिमित्त एखादा वर्षभर कार्यक्रम करू शकू तर ते उत्तम ठरेल, असे ते म्हणाले.
 
 
 
कपिल पाटील म्हणाले, "मुकुंदरावांच्या कामाला कोणत्याच शब्दात शब्दबध्द करता येणार नाही. त्यांनी आपल्या कामातून जी ज्योत पेटविली तिचा प्रकाश सगळया जगात पोहोचला नाही तरी त्या ज्योतीचा प्रकाश कोणीही नाहीसा करू शकणार नाही. शिक्षण क्षेत्रत क्रांती घडण्याची गरज आहे. समान शिक्षण झाले पाहिजे," असे ही ते म्हणाले. ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते वामनराव साठे, माजी मंत्री जगन्नाथ राव पाटील, ज्येष्ठ संघ कार्यकर्ता भास्करराव मराठे, वझे कुटुंबातील विनित वझे यांची भाषणो झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर कार्यवाह हर्षद कुलकर्णी यांनी केले तर आशुतोष देवधर यांनी आभार मानले.
@@AUTHORINFO_V1@@