शिवसेनेने 'इथे' निवडणूक लढवली तर राष्ट्रवादीही थोपटणार दंड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Dec-2020
Total Views |
गोपाळ लांडगे_1  




डोंबिवली (जान्हवी मोर्ये)
: कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या शिळफाटा परिसरात असलेल्या १४ ग्रामपंचायतीच्या निवडणूका येत्या काही दिवसात होणार आहे. पण या गावांमध्ये विकास झाला नसल्याच्या कारणावरून १४ गावांमधील सर्व पक्षीय विकास समितीने निवडणूकांवर बहिष्कार टाकला आहे. या पक्षीय विकास समितीमधील भाजप, राष्ट्रवादी यांची भूमिका निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका आहे पण शिवसेनेने आपण निवडणूक लढविणार आणि जिंकणार असल्याचे दावा केला आहे. या पूर्वी या गावांमध्ये दोनदा बहिष्कार यशस्वी झाला असला तरी यंदाच्या निवडणूकीवरून संघर्ष पेटणार असल्याचे दिसून येत आहे.
 
 
 
 
नवी मुंबई महापालिकेतून ही गावे वगळण्यात आल्यानंतर या ठिकाणी ग्राम पंचायत अस्तित्वात आली. पण या गावांमध्ये विकास कामेच झाली नाही. त्यामुळे ही गावे पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात यावीत, अशी भूमिका सर्व पक्षीय विकास समितीने घेतली आहे. ही मागणी २०१५ पासून केली जात आहे. आतापर्यत ही मागणी मान्य न झाल्याने ग्रामस्थांनी निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या निवडणूका १५ जानेवारीला होणार आहेत. मार्च २०२० मध्ये येथील वाकळण, नागाव, दहिसर, पिंपरी आणि नारीवली या गावांच्या निवडणूका जाहीर झाल्या होत्या पण या निवडणूकावर ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला होता.
 
 
त्यानंतर कोरोनाची परिस्थिती उद्भवली. निवडणूका रद्द करण्यात आल्या. २०१९ नोव्हेंबरमध्ये ही ग्रामस्थांनी निवडणूकीवर बहिष्कार टाकला. अशाप्रकारे ग्रामस्थांनी निवडणूकीवर दोनदा बहिष्कार टाकला होता. सर्व पक्षीय विकास समितीकडून शिवसेनेची मनधरणी केली जात आहे. पण त्यानंतर ही शिवसेनेने अर्ज भरल्यास त्यांना तोडीस तोड देण्याची समितीची भूमिका असणार आहे असे सर्व पक्षीय समितीचे अध्यक्ष तथा भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष ओबीसी सेलचे लक्ष्मण पाटील यांनी सांगितले.
लक्ष्मण पाटील म्हणाले, येत्या २३ तारखेला शिवसेना अर्ज भरणार का ते पाहावे लागणार आहे. त्यांनी अर्ज भरल्यास त्यांची बिनविरोध निवड होईल. शिवसेनेने अर्ज भरल्यास सर्व पक्षीय विकास समिती निवडणूकीबाबत भूमिका घेईल. त्यानंतर शिवसेनेला टक्कर देण्यासाठी सर्व पक्षातून अर्ज भरण्यात येतील. मनसे आमदारांनी आपण समितीच्या सोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. पण शिवसेनेने अर्ज भरल्यास समितीला विचारात घेऊन जागा लढविणार असल्याचे सांगितले आहे.
 
 
या गावांमध्ये रस्ते, रुग्णालये, पाणी या सुविधा आज ही नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जुलै आणि ऑगस्टमध्ये दोनदा सुनावणी झाली होती. पण त्यानंतर सांगलीला अतिवृष्टीचा तडका बसल्याने हा विषय मागे पडला. विधानसभा आचारसंहिता लागली. सरकार बदल्यानंतर हा विषय सुध्दा लांबणीवर पडला आहे. या गावांचा विकास व्हावा यासाठी आम्ही निवडणूकीवर बहिष्कार टाकला आहे. दोन-तीन महिन्यांनी गावे पुन्हा महापालिकेत गेली तर निवडणूक कशाला लढवावी यासाठी बहिष्कार टाकण्यात आला आहे.
 
 
राष्ट्रवादीचाही बहिष्कार
 
शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी पक्षाने देखील निवडणूकीवर बहिष्कार टाकून सर्व पक्षीय विकास समितीच्या आम्ही सोबत आहोत. आमच्या पक्षाची भूमिका सुध्दा निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याची आहे. आमच्या गावात अजून पर्यत पाणी आले नाही. शिवसेनेचे दोन आमदार आले त्यांनी कामाचा नारळ फोडला . पाण्याची लाईन टाकली पण पाणी आले नाही. बोअरवेल आणि विहीरी दूषित झाल्या आहेत. सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका आहे. सध्या समाजाच्या विरोधात न जाण्याची भूमिका आमची आहे, अशी माहिती सर्व पक्षीय विकास समिती सदस्य आणि राष्ट्रवादी कल्याण ग्रामीण तालुका विधानसभा संघटक मोतीराम गोंधळे यांनी दिली.
 
 
शिवसेनेला प्रत्युत्तर मिळणार
 
शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य भरत भोईर यांनी १४ गावांमध्ये शिवसेना निवडणूक लढविणार आणि जिंकणार सुध्दा असा दावा केला आहे. यासंदर्भात मुख्य निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे घेतील. मात्र सध्या तरी निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतीच्या निवडणूका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याने सर्वाचेच लक्ष या निवडणूकीकडे लागले आहे.



@@AUTHORINFO_V1@@