अक्षय कुमारने घेतली योगींची भेट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Dec-2020
Total Views |

Akshay Kumar_1  
 
मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सध्या २ दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी मंगळवारी रात्री ते मुंबईत दाखल झाल्यानंतर अभिनेता अक्षय कुमार याची भेट घेतली. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरात यमुना महामार्गाजवळ चित्रनगरी उभारण्यात येत आहे. याबाबत योगी यांनी अक्षयकुमारसोबत चर्चा केली.
 
 
 
 
"भारतीय चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अक्षयकुमार यांच्यासोबत औपचारिक भेट झाली. चित्रपट सृष्टीच्या विविध पैलूंवर त्यांच्यासोबत विस्तृत चर्चा झाली." असे योगी आदित्यनाथ यांनी ट्विट केले. चित्रपट सृष्टीतील एक कलावंत म्हणून अक्षयकुमार यांची सचोटी, समर्पण आणि सकारात्मकता निश्चितच युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत योगींनी अक्षयकुमारचे कौतुकही या ट्वीटमध्ये केले आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@