पसालथा खुआंगचेरा :भाग २

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2020
Total Views |

mizo_1  H x W:


मिझो हे मुळात म्यानमार, जो पूर्वी भारताचा भागच होता तिथून इथे आले असावेत, असे मानले जाते. त्यांची स्वतःची वेगळी भाषा आहे. भुतांवर विश्वास आहे. त्यामुळे भुतांच्या पूजेचे अनेक विधी आहेत. त्याचबरोबर अनेक पर्वत, डोंगर, शिखरे यांची पूजा केली जाते. महत्त्वाचे देव म्हणजे सूर्य आणि चंद्र. प्रत्येक गावाला एक ग्रामप्रमुख. स्वतःचे क्षेत्र जपणे आणि इतरांच्या क्षेत्रावर आक्रमण करून ते ताब्यात घेणे, हा क्रम सतत सुरू असे.


आपल्याला ‘मिझो’ हे नाव चांगले परिचित आहे. सर्व भारतीय समाजाने आत्मसात करावा, असा एक गुण या मिझो बांधवांमध्ये आहे. आजच्या कथेत मी त्याबद्दल सांगणार आहे.‘मिझो’ हे एका अनुसूचित जनजातीचे नाव असले तरी त्यामध्ये अनेक उपजाती आहेत. प्रत्येक उपजातीचे निवास क्षेत्र परस्परांना लागून परंतु ओळखता येईल, असे वेगवेगळे आहे. संपूर्ण लुशाई टेकड्या हे सर्व मिझो जनजातीचे क्षेत्र, त्यामधील लाल्लूला उत्तरेला राहतात, मंगा ईशान्येला, वायव्येला ललिथानवुनगा, नैऋत्येला लाई थांगलुआ, पश्चिमेला लायनलुल्ला आणि विविध टेकड्यांच्या वर रोलुरा. सध्याचा बांगलादेश आणि म्यानमार यांच्यामध्ये हा सर्व भाग आहे. मिझो हे मुळात म्यानमार, जो पूर्वी भारताचा भागच होता तिथून इथे आले असावेत, असे मानले जाते. त्यांची स्वतःची वेगळी भाषा आहे. भुतांवर विश्वास आहे. त्यामुळे भुतांच्या पूजेचे अनेक विधी आहेत. त्याचबरोबर अनेक पर्वत, डोंगर, शिखरे यांची पूजा केली जाते. महत्त्वाचे देव म्हणजे सूर्य आणि चंद्र. प्रत्येक गावाला एक ग्रामप्रमुख. स्वतःचे क्षेत्र जपणे आणि इतरांच्या क्षेत्रावर आक्रमण करून ते ताब्यात घेणे, हा क्रम सतत सुरू असे. त्यामुळे आक्रमक लढाई हा अंगात भिनलेला गुण. शिकार हा महत्त्वाचा सामूहिक खेळ. शिकारीच्या विशिष्ट जागादेखील ठरलेल्या. अशा या भागात परकीय इंग्रज घुसले. बंगाल आणि म्यानमार या दोन्ही बाजू त्यांच्या ताब्यात आल्या होत्या. चहाच्या मळ्यांसाठी उपयुक्त असलेल्या या भागातील अनेक स्थाने त्यांनी हेरली आणि ताब्यात घेऊन व्यापार्‍यांना देऊन टाकली. त्यांनी बाहेरून मजूर आणले, मळे बनवले, दुकाने टाकली. हळूहळू सर्व भाग इंग्रजांच्या ताब्यात गेला, लोक मजूर बनू लागले, चर्च उभी राहू लागली, शिकारीच्या जागा नष्ट झाल्या, समाजाची ग्रामप्रमुख आधारित व्यवस्था, संस्कृती नष्ट होऊ लागली. पारंपरिक बहुविध झाडांची जंगले, शेती जाऊन फक्त चहाचे मळे दिसू लागले. मुख्य म्हणजे सूर्य, चंद्र, पर्वत यांची पारंपरिक पूजा मागे पडून चर्चमधील इसाई (येशू ख्रिस्ताची) उपासना वाढू लागली. यामुळे समाज खवळला. त्याने उलट आक्रमण सुरू केले. जागोजागी संघर्ष होऊ लागले. इंग्रजांनी चांगसील हा किल्ला ताब्यात घेऊन तिथे त्यांचे प्रमुख ठाणे बनवले.



बेंग नावाच्या एका ग्रामप्रमुखाने विंचेस्टर नावाच्या चहामळे मालकावर हल्ला केला आणि त्याला लुटले. त्याची मेरी नावाची छोटी मुलगी घेऊन आला, झोलूटी नावाने तिचे स्वतःच्या घरी संगोपन केले. काही काळाने ब्रिटिशांनी ‘लुशाई एक्सपीडिशन’ या नावाने कारवाई केली आणि तिला नेण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती नव्या घरी इतकी रमली होती की, ती त्यांच्या बरोबर जायला तयार नव्हती. तिला जबरदस्ती न्यावे लागले. असे संघर्ष होत राहिले. परंतु, हळूहळू इंग्रज अधिक बळकट झाले. हे पाहून साईथामा नावाच्या एका नेत्याने थांगा आणि कालखामा जातीच्या तरुणांना एकत्र करून छोटे सैन्य जमवले आणि किल्ल्याच्या बाहेर आलेल्या इंग्रज सैन्यावर अचानक हल्ला केला. ब्राऊन हा इंग्रज प्रमुख स्वतः जखमी झाला आणि इतर सर्व सैन्य नष्ट झाले. मिझो सैन्य विजयी झाले. ब्राऊन किल्ल्यात पळून गेला. मिझोवीरांना किल्ला मात्र घेता आला नाही. या हल्ल्याच्या वेळी पसालथा खुआंगचेरा आणि गुरबांगा असे दोन तरुण वीर उपस्थित नव्हते. आपल्या सैन्याने इतका पराक्रम केला, इंग्रजांवर विजय मिळवला, पण आपण त्यावेळी उपस्थित नव्हतो, ही गोष्ट दोघांना इतकी मनाला लागली की त्यांना स्वस्थ बसवेना. ब्राऊन किल्ल्यात जीवंत परत गेला आहे, हे त्यांना माहीत होते. आपण हल्ला करून त्याला संपवायचे असे त्यांनी ठरवले. दोघांनीच किल्ल्यावर हल्ला केला, पण त्यांना यश आले नाही. गुरबांगाच्या अंगात गोळ्या घुसल्या. तो धारातीर्थी पडला. भारतातील अनेक भागाप्रमाणे मिझो भागातही ही परंपरा आहे की, मृत वीराचे शव शत्रूच्या ताब्यात जाऊ द्यायचे नाही. पसालथाला स्वतःचा जीव वाचवून येणे शक्य होते. परंतु, मित्राचे ते शव उचलून आणत असताना तोसुद्धा इंग्रजांच्या गोळ्यांना बळी पडला. या सगळ्या झटापटीत ब्राऊन मात्र जखमा चिघळून मेला.मिझोवीरांपासून आपण सर्वांनी शिकण्याची गोष्ट काय? मिझो समाज बचावात्मक युद्ध करीत नाही तर आपल्या क्षेत्राबाहेर जाऊन आक्रमक युद्ध करतो. शतकानुशतके बचावात्मक युद्ध करून आपली पवित्र भूमी गमावणार्‍या भारतीय हिंदू समाजाने हे शिकले पाहिजे.


- नरेंद्र पेंडसे 
@@AUTHORINFO_V1@@