राष्ट्र मंदिरात विविधता आणि एकता यांचे दर्शन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2020
Total Views |

Indresh Kumar_1 &nbs
मुंबई : “आदर्श रामराज्याचे स्मरण करून ‘राम मंदिर ते राष्ट्र मंदिरा’त समाजाच्या कल्याणाचा विचार तर होईलच, शिवाय यात विविधता आणि एकता यांचे दर्शन होईल,” असे मत रा. स्व. संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमार यांनी व्यक्त केले. सा. ‘विवेक’ व ‘हिंदी विवेक’च्यावतीने ‘राम मंदिर ते राष्ट्र मंदिर’ ग्रंथानिमित्ताने सोमवार, दि. २१ डिसेंबरपर्यंत सलग चार दिवस सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन हिंदी राष्ट्रजागरण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार, दि. १८ डिसेंबर रोजी सायंकाळी इंद्रेश कुमार यांचे ’मुस्लीम मानस और श्रीराम’ या विषयावर व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते.
 
इंद्रेश कुमार यांनी आपल्या भाषणात आदर्श रामराज्याचे स्वरूप, रामजन्मभूमी आंदोलन, श्रीराम मंदिर निर्माण अशा अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. इंद्रेश कुमार म्हणाले की, “श्रीराम हे ईश्वररूप आहे. त्याचे विचार, नैतिकता, सत्य हे कोणीही नाकारू शकत नाहीत, म्हणून ते प्रत्येक भारतीयाच्या नसासात भिनले आहेत. साडेचारशे वर्षांपूर्वी परकीय आक्रमक बाबराने अयोध्येतील श्रीरामाचे मंदिर उद्ध्वस्त केले, तेव्हापासून मंदिर निर्माण करण्यासाठी संघर्ष सुरू होता. 
 
५ ऑगस्ट रोजी मंदिर निर्माणाचे स्वप्न साकार झाले. आजच्या समाजव्यवस्थेत ‘लव्ह जिहाद’ ही समस्या कर्करोगासारखी बनली आहे. या संकटाचे अनेक धोके आहेत. त्यामुळे या संकटाचे उच्चाटन होणे आवश्यक आहे. आदर्श रामराज्याची संकल्पना प्रभावी असून त्यातून आदर्शवत राष्ट्र मंदिर उभे राहावे, यासाठी सा. ‘विवेक’चे सुरू असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत,” असेही इंद्रेश कुमार यांनी सांगितले. सा. ‘विवेक’ आणि ‘हिंदी विवेक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पेडणेकर यांनी या व्याख्यानमालेचे प्रास्ताविक केले. सा. ‘विवेक’च्या https://www.facebook.com/VivekSaptahik व ‘हिंदी विवेक’च्या http://www.facebook.com/hindivivekmagazine या फेसबुक पेजवरून व यूट्युब चॅनेलवरून ही व्याख्यानमाला प्रसारित करण्यात आली.
 
 
@@AUTHORINFO_V1@@