रा. स्व. संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Dec-2020
Total Views |

M G Vaidya_1  H
 
 
नागपूर : विचारवंत पत्रकार, हिंदुत्वाचे भाष्यकार, तरुण भारतचे माजी मुख्य संपादक, रा. स्व. संघाचे माजी बौद्धिक व प्रचार प्रमुख माधव गोविंद उपाख्य बाबुराव वैद्य यांचे शनिवार १९ डिसेंबर रोजी निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. मा. गो. वैद्य यांनी संघाच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुनंदा, तीन मुली- विभावरी गिरीश नाईक, डॉ. प्रतिभा उदय राजहंस, भारती जयंत कहू, तसेच पाच मुले- धनंजय, डॉ. मनमोहन (सह सरकार्यवाह, रा. स्व. संघ), श्रीनिवास, शशिभूषण व डॉ. राम (हिंदू स्वयंसेवक संघ, सह संयोजक) व बराच मोठा आप्त परिवार आहे.
 
 
मा. गो. वैद्य यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही ट्विट करून श्रद्धांजली अर्पण केली. "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, ज्येष्ठ संपादक आणि विचारवंत मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांना माझी विनम्र श्रद्धांजली. पूज्य गुरुजी यांच्यासह सर्व सरसंघचालकांसोबत काम करण्याचे, त्यांना जवळून अनुभवण्याचे भाग्य बाबुरावांना लाभले होते. विधान परिषद सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द सगळ्या लोकप्रतिनिधींसाठी सदैव आदर्शवत राहील. माझ्या लहानपणापासून बाबुरावजींशी माझा व्यक्तिगत व जवळचा संबंध राहिला. मला कायम त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद मिळाले."
 
 
खरे तर बाबूरावजी शतायुषी होतील, हा ठाम विश्वास होता, परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एक व्रतस्थ आणि ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले याचे अतीव दु:ख आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो. ॐ शांती, अशी श्रद्धांजली नितीन गडकरींनी व्यक्त केली. त्यांची अंत्ययात्रा रविवार २० डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता त्यांचे राहते घर- ८०, विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर- २२ येथून निघणार असून अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
 
 
@@AUTHORINFO_V1@@