कोविड योद्ध्यांचे अभिनंदन! देशात ९५ लाखांहून जास्त रुग्ण ठणठणीत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Dec-2020
Total Views |

Covid Yoddha_1  



सध्या ३,१३,८३१ सक्रीय रुग्ण

 
 
नवी दिल्ली : कोरोनाच्या जागतिक महामारी विरोधातल्या लढ्यात भारताने महत्वाचा आणखी एक टप्पा गाठला आहे. भारतात रुग्ण बरे होण्याचा कल जारी राहिला असून कोरोनातून बरे झालेल्यांच्या एकूण संख्येने ९५ लाखाचा (९५,२०,८२७) महत्वाचा टप्पा केला आहे. सक्रीय रुग्ण आणि बरे झालेल्यांच्या संख्येतले अंतर सातत्याने वाढत आहे. सक्रीय रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या ९२ लाखाने (९२,०६,९९६)जास्त आहे. बरे होण्याचा दरही वाढून ९५.४०% झाला आहे. जागतिक स्तरावर हा दर सर्वोच्च असलेल्या देशांपैकी भारत एक आहे.
 
सक्रीय रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची एकूण संख्या ३० पटीने जास्त आहे. भारतात सध्या ३,१३,८३१ सक्रीय रुग्ण असून ते भारताच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णांच्या केवळ ३.१४% आहे. दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त असल्याने बरे झालेल्यांच्या एकूण संख्येत वाढ होण्याबरोबरच सक्रीय रुग्णातही घट नोंदवण्यात येत आहे. गेल्या २४ तासात भारतात २२,८९० कोविड बाधितांची नोंद झाली आहे. याच काळात ३१,०८७ रुग्ण कोरोना मुक्त झाले. गेले २१ दिवस दैनंदिन नव्या रुग्णापेक्षा बरे झालेल्यांची संख्या सातत्याने जास्त आहे.
 
देशात बरे झालेल्या एकूण रुग्णांपैकी सुमारे ५२% (५१.७६%) रुग्ण ५ राज्यातले आहेत. नव्याने बरे होणाऱ्या रुग्णांपैकी ७५.४६% रुग्ण १० राज्य/ केंद्र शासित प्रदेशात आहेत. बरे झालेल्यांची एका दिवसातली सर्वाधिक संख्या केरळमध्ये नोंदवली गेली असून इथे एका दिवसात ४,९७० रुग्ण बरे झाले. महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ४,३५८ तर पश्चिम बंगाल मध्ये २,७४७ रुग्ण बरे झाले. नव्या रुग्णांपैकी ७६.४३% रुग्ण १० राज्य/ केंद्र शासित प्रदेशात आहेत. केरळ मध्ये सर्वात जास्त म्हणजे ४,९६९ दैनंदिन रुग्णांची नोंद झाली पश्चिम बंगाल मध्ये २,२४५ आणि छत्तीसगड मध्ये १,५८४ नव्या रुग्णांची नोंद झाली.
 
गेल्या २४ तासात ३३८ मृत्यूंची नोंद झाली. या पैकी सुमारे ७५.१५% मृत्यू १० राज्य / केंद्र शासित प्रदेशातले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे दैनंदिन (६५) मृत्यूंची नोंद झाली. पश्चिम बंगाल मध्ये ४४ आणि दिल्लीमध्ये ३५ मृत्यूंची नोंद झाली. भारतात दैनंदिन मृत्यू संख्येत सातत्याने घट होत आहे. गेल्या १३ दिवसापासून दैनंदिन मृत्यू संख्या ५०० पेक्षा कमी नोंदवली गेली आहे.




@@AUTHORINFO_V1@@