दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या ‘कोविड योद्धा १२५’चे प्रभाकर शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

    17-Dec-2020
Total Views |

Covid Yoddha 125_1 &



मुंबई : दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या बहुचर्चित ‘कोविड योद्धा १२५’ या विशेषांकाचे प्रकाशन मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते आणि नगरसवेक प्रभाकर शिंदे यांच्या हस्ते गुरुवार, दि. १७ डिसेंबर रोजी महापालिका मुख्यालयातील त्यांच्या कार्यालयात करण्यात आले. यावेळी मुंबई महापालिकेतील भाजपचे प्रभारी, भाजपचे प्रवक्ते नगरसेवक भालचंद्र शिरसाट आणि महापालिकेतील भाजपचे नगरसेवक कमलेश यादव तसेच दै. ‘मुंबई तरुण भारत’चे व्यवसाय प्रतिनिधी रवींद्र जाधव उपस्थित होते. प्रकाशनानंतर प्रभाकर शिंदे यांनी या सर्व ‘कोविड योद्ध्यां’चे तसेच हा अंक साकारणार्‍या दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या टीमचेही कौतुक केले.




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.