पालकांनी शालेय शुल्क भरावे यासाठी एक दिवसीय ;ऑनलाईन शिक्षणाला ब्रेक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2020
Total Views |

online_1  H x W
 
 
 
 
 

डोंबिवली :
कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला त्यामुळे सरकारने शाळांनी शुल्क वाढवू नये तसेच शाळांनी शुल्क साठी पालकांकडे तगादा लावू नका असे जाहीर केले होते. पण आता शाळांना ही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पालकांनी आता शाळेचे शुल्क भरावी याकडे लक्ष वेधण्यासाठी पुष्माच्या अंतर्गत कल्याण डोंबिवलीसह मुंबईतील १४५ शाळांनी आज एक दिवसांसाठी ऑनलाईन शिक्षण बंद ठेवले होते.




या बंदमध्ये कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि मुंबई मधील शाळांचा समावेश आहे. कोरोनाचा रूग्ण मार्च महिन्यात आढळून आल्यानंतर शाळा बंद करण्यात आल्या. त्यामुळे मागील शैक्षणिक वर्षातील तीस ते चाळीस टक्के फी आली नव्हती. येत्या शैक्षणिक वर्षातील आठ महिन्यात केवळ वीस ते तीस टक्के शुल्क शाळांकडे जमा करण्यात आले आहे. शाळेत शालेय शुल्क येत नाही.
 
 


सरकारने पहिला अध्यादेश काढला त्यात शुल्क वाढवू नका, शुल्कांसाठी सातत्याने मागणी करू नका असे सांगितले. त्यामुळे पालकांना शुल्क नाही दिली तरी चालणार असल्याचा त्यांचा समज झाला आहे. सरकारने शुल्कांचा विषय सर्वाच्च न्यायालयात नेण्यात आला होता. त्यानंतर हा निर्णय उच्च न्यायालयाने घ्यावा असे सर्वाच्च न्यायालयाने सांगितले. त्यामुळे शालेय शुल्कांचा विषय आज ही उच्च न्यायालयात सुरू आहे.





महाराष्ट्रात आज चाळीस टक्के मुले शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर आहे. काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ता पालकांसोबत येऊन शालेय शुल्क कमी करा यासाठी दबाव आणत असतात. ज्या पालकांनी फी भरली नाही त्यांची खरीच अडचण आहे ती आम्ही समजून घेवू शकतो. पण ज्या पालकांनी शुल्क भरली नाही तर संस्थाचालक शिक्षकांचे वेतन कसे देणार असा प्रश्न आहे. कोरोना काळात शाळांना कोणत्याही विद्याथ्र्याना शिक्षणापासून वंचित ठेवायचे नाही. पण पालकांनी शुल्क भरली नाही तर काय परिस्थिती ओढावू शकते. हा बंद नाही. केवळ आम्ही पालकांना जागृत करीत आहोत, अशी माहिती फेडरेशन ऑफ स्कूल असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे उपाध्यक्ष भरत मालिक यांनी माहिती दिली.



@@AUTHORINFO_V1@@