सरनाईक यांचा तिसरा घोटाळा : वाचा धक्कादायक माहिती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Dec-2020
Total Views |

Sarnaik _1  H x
 
 
 

भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी केली चौकशीची मागणी

 
 
 
कल्याण : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा आणखी एक घोटळा भाजपनेते किरीट सोमैय्या यांनी गुरुवारी उघडकीस आणला. कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना सादर करून चौकशीची मागणी केली. प्रताप सरनाईक व त्यांचे सहकारी मोहीत अग्रवाल यांनी ११२ जमिनींचे व्यवहार केले होते. त्यांचा एनएसईएलचा २५० कोटीचा घोटाळा बाहेर आला होता. त्या पैशातून त्यांनी कल्याणच्या गुरूवली येथे ७८ एकर जमीन खरेदीचे व्यवहार केले आहेत. त्यांच्या जमीन खरेदीवर ईडीची जप्ती आलेली असताना हे व्यवहार पुढे सुरूच ठेवले आहेत. प्रताप सरनाईक यांचा हा तिसरा घोटळा उघडकीस आला आहे.
 
 
 
किरीट सोमैय्या यांनी सांगितले की, "सरनाईक यांच्या कंपनीने कल्याण तालुक्यातील टिटवाळाजवळ ७८ एकर जमीन विकत घेतली. यामध्ये ११२ जमिनीचा समावेश होता. या जमिन घोटळ्य़ाच्या पैशातून मनीलॉन्डरिंग व घोटाळ्य़ांचा पैसा पार्क केला होता. २०१३-१४ मध्ये नॅशनल स्पॉट एक्सेंज लिमिटेड (एनएसईएल) ५,६०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला होता. त्यात सरनाईक यांचे भागीदार मोहित अग्रवाल आणि त्यांच्या पूर्ण ग्रुपच्या कंपनीने एनएसईएलच्या २५० कोटी रूपये त्यांच्या जुगरनट कंपनीत वळविले. सरनाईक यांच्या विहंग ग्रुप, अग्रवाल आणि त्यांच्या आस्था ग्रुपने भागीदारीत विहंग आस्था हौसिंग कंपनीची स्थापना केली. एनएसईएल घोटाळ्यांचे सुमारे शंभर कोटी रूपये त्यात वळविले.
 
 
या घोटाळ्य़ातील पैशातून टिटवाळा येथे ११२ जमिनी विकत घेतल्या. या जमिनीवर जानेवारी २०१४ मध्ये ईडीची जप्ती आल्याचे सांगत त्यानंतर ही जमिनीमध्ये काही आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप सोमैय्या यांनी केला आहे. ईडीकडून सरनाईक यांच्या ११२ जमिनींवर जप्ती आणली आहे. ईडीच्या दृष्टीने या जमिनी अजून जप्तच आहेत. परंतु तलाठी व तहसीलदार कार्यालयात चौकशी करताना आता या जमिनी इतर कोणाच्या नावावर दिसत आहेत.
 
 
सरनाईक यांनी ईडी व मुंबई पोलिसांना न कळवता आपल्या कंपनीचे नाव विहंग आस्था हौसिंग बदलून विहंग सिटी डेव्हलपर्स असे केले आहे. या आणखीन एका घोटाळ्य़ाचा तपास करून कारवाई करण्याची मागणी सोमैय्या यांनी केली आहे. तसेच पहिला घोटळा एमएमआरडीएचा १७५ कोटींचा, दुसरा घोटाळा विंहग गार्डनमध्ये १३ मजल्याच्या दोन अनधिकृत इमारती बांधून विकून पळून जायचा आणि तिसरा घोटाळा एनएसईलमध्ये २५० कोटींचा असल्याचे गंभीर आरोप सोमैय्या यांनी केले आहे.
सोमैय्या यांनी टिटवाळ्य़ाजवळ खरेदी केलेल्या ७८ एकर जमीनीची आज पाहणी केली. घोटाळेबाजांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करत उध्दव ठाकरे यांचे उत्तर देणार का?, असा सवाल ही त्यांनी केला. प्रताप सरनाईक यांच्या कंपनीने यापूर्वी केलेले दोन घोटाळे भाजपानेते किरीट सोमैय्या यांनी उघड केल्याने त्यांच्यावर विरोधात शंभर कोटी रूपयांचा अब्रु नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले होते.
 
 
त्यावर सोमैय्या यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ते माङया विरोधात एक ही रूपयांचा दावा दाखल करू शकत नाही. त्यांनी ठाण्यात बेकायदा दोन इमारती उभारल्या आहेत. त्यांना ठाणे महापालिकेने ओसी दिलेली नसताना त्या इमारतीत नागरिक वास्तव्य करीत आहेत. सरनाईक यांनी बेकायदा इमारती बांधून त्या सामान्य नागरिकांना विकून त्यांची फसवणूक केली आहे. आधी त्याचे उत्तर द्याव मग कोटयावधी रूपयांचा दाव्याची भाषा करावी.
 
 
 
 
 
उद्धटपणा बंद करा !
 
उध्दव ठाकरे सरकारचा उध्दटपणा बंद करा. आरे कार शेडचे काम बंद करा. दिवाळीपूर्वी नागरिकांना मेट्रो रेल्वेत बसू द्या अशी मागणी सोमैय्या यांनी केली आहे.

@@AUTHORINFO_V1@@