प्रताप सरनाईकांच्या "विहंग ग्रुप ऑफ बिल्डर्सचे" बांधकाम अनधिकृत - किरीट सोमय्या
मुंबई: विहंग ग्रुप ऑफ बिल्डर्सने बांधलेल्या विहंग गार्डन ठाणेचे बी १ आणि बी २ अशा दोन इमारती अनधिकृत असून त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश २०१२ मध्ये देण्यात आले होते. ह्या दोन्ही बी १ आणि बी २ इमारतींना अजूनही वापर परवाना (OC) मिळाला नाही. त्याचप्रमाणे या इमारतीचे ९ ते १३ क्रमांकाचे मजले अनधिकृत असल्याचे व ते ताबडतोब तोडण्याचे आदेशसुद्धा २०१२ मध्ये देण्यात आले होते. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माहितीच्या अधिकारा खाली केलेल्या अर्जाच्या उत्तरात ठाणे महापालिककेनी त्यांना ही माहिती दिली आहे.
यासंबंधी ठाणे महानगरपालिकेकडे प्रताप सरनाईक यांनी अपिल केल्यानंतर काही अटीवर अनधिकृत बांधकाम तोडण्याचे काम तात्पुरते थांबवण्यात आले. किरीट सोमय्या यांनी हे अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी श्री. प्रताप सरनाईक व विहंग ग्रुप ऑफ बिल्डर्सच्या विरोधात ताबडतोब कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तसेच त्यांनी ठाणे महापालिका गटाचे नेते संजय वागुले यांच्यासोबत काल ठाणे महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात आतापर्यंत कारवाई का केली नाही? अशी तक्रारही केली.
किरीट सोमय्या व वागुले यांनी विहंग गार्डन या इमारतीची पण प्रत्यक्ष पाहणी केली. या इमारतीत प्रताप सरनाईक यांचे कार्यालयही आहे. तसेच प्रताप सरनाईक यांचे घोटाळेबाज भागीदार अमित चंदोळे तेही या इमारतीत १२/१३ व्या मजल्यावर राहत आहेत.