‘दै. मुंबई तरुण भारत’च्या ‘कोविड योद्धा १२५’चे हरिष भांदिर्गे यांच्या हस्ते प्रकाशन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2020
Total Views |

Covid Yoddha 125 _1 
 
 
मुंबई : ‘दै. मुंबई तरुण भारत’च्या बहुचर्चित ‘कोविड योद्धा १२५’ या विशेषांकाचे प्रकाशन भाजपचे उत्तर-मध्य मुंबई जिल्हा उपाध्यक्ष आणि नगरसेवक हरिष भांदिर्गे यांच्या हस्ते मंगळवार, दि. १५ डिसेंबर रोजी कुर्ला येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले.
 
 
यावेळी ‘दै. मुंबई तरुण भारत’चे व्यवसाय प्रतिनिधी रवींद्र जाधव आणि चांदिवली विधानसभा प्रभाग क्र. १६४ मधील वॉर्ड अध्यक्ष निलेश दळवी, युवा मोर्चाचे वॉर्ड अध्यक्ष रोशन सिंह आणि कार्यकर्ते उपस्थित होते. प्रकाशनानंतर हरिष भांदिर्गे यांनी या सर्व ‘कोविड योद्ध्यां’चे तसेच हा अंक साकारणार्‍या ‘दै. मुंबई तरुण भारत’च्या टीमचेही कौतुक केले.



@@AUTHORINFO_V1@@