ठाण्यात ‘प्रतापी’ लोकप्रतिनिधीच्या हट्टापायी २३ कोटींची उधळपट्टी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Dec-2020
Total Views |

covid center thane_1 





रुग्णांअभावी रुग्णालये ओस, ‘व्होल्टास’ रुग्णालयासाठी पालिकेची घाई




ठाणे: ठाणे महापालिकेने कोविड रुग्णांसाठी उभारलेले ‘ग्लोबल इम्पॅक्ट हब’, ‘भूमिपुत्र रुग्णालय’ ही रुग्णालये रुग्णांअभावी रिकामी आहेत व बुश कंपनीच्या जागेवरील रुग्णालयामध्ये उद्घाटनानंतर केवळ तीन रुग्ण आहेत. ठाण्यातील एका ‘प्रतापी’ लोकप्रतिनिधीच्या हट्टापायी महापालिका प्रशासनाने ‘व्होल्टास’ कंपनीच्या जागेवरील १०८५ बेडचे कोविड रुग्णालय सुरू करण्याची घाई सुरू केली आहे.
 


तब्बल २३ कोटी रुपयांच्या रुग्णालयासाठी कंत्राटदाराला महापालिकेने घाईघाईने कार्यादेश दिल्याने भाजप गटनेते संजय वाघुले यांनी आक्षेप घेतला असून, रुग्णालय उभारण्यास विरोध दर्शविला आहे.



‘कोविड’ रुग्ण घटल्याची माहिती महापालिका मोठ्या कौतुकाने जाहीर करते. मात्र महापालिकेच्या रुग्णालयामध्ये २३०० बेड रिक्त असतानाही, नवे १०८५ बेड क्षमतेचे ‘व्होल्टास’ रुग्णालय का उभारले जात आहे. तब्बल २३ कोटींच्या कामासाठी कंत्राटदाराला कार्यादेश म्हणजे केवळ निधी लाटण्याचा उद्योग आहे,” असा आरोप भाजप गटनेते संजय वाघुले यांनी केला. तेव्हा, “सत्ताधार्‍यांच्या दबावापोटी महापालिका प्रशासन किती झुकते,” असा सवालही वाघुले यांनी केला.


@@AUTHORINFO_V1@@