मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचे पाणीबिल भरलं!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2020
Total Views |

CMO Maharashtra_1 &n
 
 


मुख्यमंत्री कार्यालयातर्फे स्पष्टीकरण


मुंबई : मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ या बंगल्याची पाणी बिलापोटी कोणतीही थकबाकी नाही, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातर्फे देण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या अहवालानुसार वर्षा आणि तोरणा या दोन्ही बंगल्यांची थकबाकी ‘निरंक’ आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान म्हणून मलबार हिल स्थित ‘वर्षा’ आणि त्याच्याशी संलग्न ‘तोरणा’या बंगल्यांचा समावेश आहे.
 
 
 
या दोन्ही बंगल्यांचे पाणी बिल थकीत असल्याचे वृत्त सोमवारी प्रकाशित झाले होते. त्यात कोणतेही तथ्य नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयातर्फे देण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलकामे विभागाच्या कार्यालयाने याबाबत थकबाकी अहवाल दिला आहे. त्यामध्ये या दोन्ही बंगल्यांची थकबाकी शून्य असल्याची माहिती कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.



 
@@AUTHORINFO_V1@@