मुंबई : मुंबईचा वडापाव की गुजरातचा ढोकळा, महाराष्ट्राचा मोदक की गुजराती फाफडा, महाराष्ट्राची मिसळ कि गुजरातचा खमण, असं वाक् युद्ध ट्विटरवर मंगळवारी सुरू होते. खरं म्हणजे यात महाराष्ट्राने बाजी मारली. कारण गुजराती भाषिक युझर्सपेक्षा मराठी युझर्सनी महाराष्ट्रातील विविध खाद्यपरंपरांची ओळख साऱ्यांना करून दिली.
झणझणीत मिसळ, तिखट वडापाव, श्रीखंड-पुरी, कांदेपोहे, पुरणपोळी, उकडीचे मोदक, भाकरी, मासळी, चिकन-मटण, तांबडा पांढरा, कोल्हापूरी ठेचा असो वा मालवणचा झणझणीत रस्सा, एकच चढाओढ सुरू झाली. महाराष्ट्रातील खाद्यपरंपरा यानिमित्ताने ट्रेंड होऊन झळकू लागली. कुणीतरी म्हटलं गुजरातचा ढोकळाही उत्तम लागतो, मग काय मराठी पोरांनीही आपल्या संस्कृतीची ओळख करून दिली.
खवय्यांना मात्र, प्रश्न !
खाद्यपदार्थ कुठलाही असो खाद्यप्रेमींसाठी पर्वणीच असते. इतके चमचमित पदार्थ पाहून साऱ्यांच्याच तोंडाला पाणी सुटले. काही का होईना या शब्द युद्धाचा आस्वाद साऱ्यांनीच घेतला. महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांची ही शाब्दीक मेजवानी साऱ्यांनीच अनुभवली.