कर्नाटकात काँग्रेसची गुंडशाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2020
Total Views |

karnataka_1  H
 

विरोधकांकडून लोकशाहीला काळीमा फासण्याचा प्रकार; भाजपची टीका

 
 
 
 
बंगळुरु : अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात घमासान झाल्याचे पहायला मिळत असतानाच शेजारील राष्ट्र कर्नाटकातही राडेबाजी झाल्याचे चित्र दि. १५ डिसेंबर रोजी पहायला मिळाले. 
 
 
 
कर्नाटकमधील विधानपरिषदेमध्ये मंगळवारी सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये जोरदार आमना-सामना झाला. विरोधी पक्ष काँग्रेसच्या काही आमदारांसह इतर सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत उपसभापतींना खुर्चीवरून खाली खेचण्याचा प्रयत्न केला. विरोधकांच्या या पावित्र्याविरोधात सत्ताधारी भाजप आमदारांनीही आक्रमक भूमिका घेतल्याने सभागृहात जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. यावेळी दोन्ही बाजूच्या आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी झाली. अनेकवेळापर्यंत सभागृहात गोंधळ सुरु राहिल्याने मंगळवारी सभागृह दणाणून गेले. सभापतींनी सभा तहकूब केल्यानंतर हा गोंधळ शमला. मात्र सभागृहाबाहेर आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या तीव्र फैरी झडल्या. विरोधकांनी उपसभापतींना खुर्चीवरून खाली खेचण्याचा प्रयत्न करत लोकशाहीला काळीमा फासल्याची टीका सत्ताधारी भाजपकडून करण्यात आली. तर सत्तेचा गैरवापर करत सत्ताधारी भाजप हुकुमशाहीचा कारभार करत असल्याची ओरड यावेळी विरोधकांकडून करण्यात आली.
 
 
 
 
कर्नाटकातील विधानपरिषदेमध्ये मंगळवारी सत्ताधारी भाजपकडून गोहत्या बंदी विधेयक सभागृहात सादर होणार होते. पण त्याआधीच काँग्रेस आमदारांनी उपसभापतींना त्यांच्या खुर्चीवरुन खाली खेचण्याचा प्रयत्न केला आणि तुफान राडा सुरु झाला. सभागृहाचे कामकाज चालू होताच विधानपरिषदेतील काँग्रेस आमदारांनी उपसभापतींना जबरदस्तीने खुर्चीवरुन खेचून बाहेर काढले. उपसभापतींनी त्यांच्या खुर्चीवर बसणे असवैधानिक आहे, असे या आमदारांचे म्हणणे होते. अखेर सुरक्षा रक्षकांना हस्तक्षेप करावा लागला. यानंतर सभापतींनी सभा तहकूब केली आणि गोंधळ शांत झाला.
 
 
 
गोहत्या विधेयक सादर करण्यावरून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री अश्वथानारायण आणि काँग्रेस आमदारांमध्ये शाब्दीक वादावादी सुरु झाली. हे विधायक मंजूर होवू नये यासाठी काँग्रेसने विधानपरिषदेच्या सर्व आमदारांसाठी व्हीप जारी केला होता. गोहत्या बंदी विधेयकाविरोधात काँग्रेसला मतदान हवे होते. काँग्रेसला विधेयकाविरोधात मतदान करायचे होते. मंजुरीआधी जेडीएसला ते विधेयक समितीकडे पाठवायचे होते. मात्र सत्ताधारी भाजपने विरोधकांची ही मागणी जुमानली नाही. त्यावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले.
 
काँग्रेसच्या आमदारांचे वागणे गुंडांसारखे
 
 
सभागृहात काही आमदार गुंडासारखे वागले. त्यांनी उपसभापतींना जबरदस्तीने खुर्चीवरुन खेचले. त्यांच्यासोबत गैरवर्तन केले. विधानपरिषदेच्या इतिहासात इतका लाजिरवाणा दिवस आम्ही बघितलेला नाही. लोक आमच्याबद्दल काय विचार करतील, तो विचार करुन मला लाज वाटते.
 
 
- लेहर सिंह सिरोया, आमदार, भाजप
असंवैधानिक कारभार
 
 
भाजपा आणि जेडीएसने सभापतींना बेकायदा पद्धतीने खुर्चीवर बसवले. भाजपा अशा असंवैधानिक पद्धतीने वागते हे दुर्देवी आहे. आम्ही त्यांना खुर्चीवरुन उतरायला सांगितले होते. पण ते बेकायद तिथे बसले असल्याने आम्ही त्यांना तिथून हटवावे लागले.
 
 
- प्रकाश राठोड, आमदार, काँग्रेस
@@AUTHORINFO_V1@@