आसाममध्ये सर्व सरकारी मदरसे बंद !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Dec-2020
Total Views |

Assam_1  H x W:
 
नवी दिल्ली : आसाम सरकारला राज्यातील सर्व सरकारी मदरसे आणि संस्कृत शाळा बंद करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. "शिक्षण क्षेत्र आम्ही खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष बनवत आहोत. म्हणून आतापासून राज्यातील ७४० मदरशांमध्ये यापुढे इस्लाम विषयी शिक्षण पूर्णपणे बंद करून गणित आणि विज्ञान सारखे विषय शिकवले जाणार आहेत," अशी घोषणा आसामचे शिक्षण मंत्री हिमांता बिस्वा सरमा यांनी केली आहे.
 
 
 
आसामचे शिक्षणमंत्री हेमंत बिस्वा सरमा म्हणाले, "आमच्या मंत्रिमंडळाने शिक्षणाला धर्मनिरपेक्ष करण्याचा निर्णय घेतला. आसाममध्ये १९८ उच्च मदरसे आणि ५४२ अन्य मदरसे इतर सामान्य शैक्षणिक संस्थांप्रमाणे चालतील आणि विद्यार्थ्यांना त्यांनी धार्मिक अभ्यासात प्रवेश दिला नाही." यापूर्वीही सरमा यांनी सांगितले होतो की, “सरकार सार्वजनिक पैशाचा वापर धार्मिक शास्त्र शिकवण्यासाठी करु शकत नाही. यापूर्वीच आम्ही विधानसभेत या धोरणाबाबत माहिती दिली होती की, सरकारी पैशातून कोणतेही धर्मिक शिक्षण दिले जाऊ नये.”
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@