डॉ. शीतल आमटेंच्या श्रद्धांजलीला कुटूंबच अनुपस्थित !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2020
Total Views |

Shital_1  H x W



करजगी कुटूंबीय म्हणाले...

 
चंद्रपूर : समाजसेवक बाबा आमटे यांच्या नात आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या श्रद्धांजली सभेला आमटे कुटूंबीय अनुपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा हा वाद चर्चेत आला आहे. शीतल आमटे यांच्या शोकसभेला आमटे कुटुंबीय उपस्थित न राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
 
 
 
रविवारी सकाळी आनंदवनात शीतल आमटे-करजगी यांच्या समाधीस्थळावर श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली. या सभेला आमटे कुटूंब उपस्थित राहतील, अशी अपेक्षा सर्वांना होती. मात्र, या श्रद्धांजली सभेला पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे. शोकसभेला आनंदवनशी निगडीत अनेकांनी प्रत्यक्षपणे आणि झूम अॅपद्वारे सहभाग नोंदवला. सर्वांनी आमटे यांच्या स्मृतींना उजळा दिला.
 
 
 
डॉ.शीतल आमटे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सासू-सासरे म्हणजे शिरीष आणि सुहासिनी करजगी यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून आमटे कुटूंबावर गंभीर आरोप केले होते. या प्रकारानंतर शीतल यांच्या मृत्यू प्रकरणाबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले होते. शोक सभेला आमटे कुटूंब हजर राहील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीमुळे हा वाद अद्याप शमला नसल्याचे स्पष्ट आहे.
 
 
 
यावेळी फेसबुकवर लिहिलेली पोस्ट आणि आमटे कुटुंब यांच्या गैरहजेरी बाबत उपस्थितांपैकी कुणीही बोलण्यास नकार दिला होता. मात्र, शीतल यांच्यामुळे आनंदवनाशी भावबंध जोडले गेले, असल्याची भावूक प्रतिक्रीया सासरच्या मंडळींकडून व्यक्त करण्यात आली.
 
 
३० नोव्हेंबर रोजी आनंदवन येथील राहत्या घरी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली. त्यांनी घरात विषारी इंजेक्शन घेऊन स्वतःला संपवले. त्यांना वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पण त्यापूर्वीच शीतल यांची प्राणज्योत मालवली. शीतल आमटे यांच्याकडे आनंदवनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद होते. बाबा आमटे यांच्या तिसऱ्या पिढीचे नेतृत्व त्याच्या जवळ होते. काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत कलह सुरू असल्याने हा वाद अनेकदा चव्हाट्यावर आला होता.
@@AUTHORINFO_V1@@