भाजप ओबीसी समाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे : देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Dec-2020
Total Views |

Devendra Fadanvis_1 
 


मुंबई : भारतीय जनता पार्टी भक्कमपणे ओबीसी समाजाच्या मागे उभी आहे, असे प्रतिपादन विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची बैठक रविवारी मुंबईत पार पडली. यावेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.
 
 
 
 
फडणवीस म्हणाले, "भाजपचा ओबीसी मोर्चा ही केवळ एक आघाडी नाही, तर शेवटच्या माणसाच्या विकासासाठी कटिबद्ध असा कार्यकर्त्यांचा संच आहे. शेवटच्या माणसाचा विकास झाला तरच देशाचा विकास होतो म्हणून तुमची जबाबदारी अधिक आहे. आपल्या सरकारने ओबीसी समाजासाठी अनेक योजना राबविल्या पण आज या सरकारने ओबीसी समाजासाठी पैसा देणे बंद केले आहे."
 
 
 
मंत्र्यांचाच ओबीसी आरक्षणावर सवाल
 
 
'आज तर या सरकारमधील मंत्रीच ओबीसी आरक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. पण भाजपा ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आपल्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही यासाठी कायदेशीर तरतूद केली. ओबीसी आरक्षणात वाटेकरी नको, ही भाजपची अधिकृत भूमिका आहे. पुढचा काळ संघर्षाचा आहे.', असेही ते म्हणाले.


@@AUTHORINFO_V1@@