नाशिकच्या सुपुत्राला जम्मूमध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2020
Total Views |

ghuge_1  H x W:







मेजर सुरेश घुगे डोक्याला गंभीर दुखापत होऊन झाले शहीद




जम्मू: शुक्रवारी दि. ११ डिसेंबर रोजी नांदगांव तालुक्याच्या अस्तगावमधील जवान मेजर सुरेश सैन्य दलात सेवा बजावताना घुगे जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झाले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सुरेश घुगे यांचा वीरमरण आले. लष्कराकडून शनिवारी पहाटे अस्तगाव येथील त्यांच्या कुटुंबीयांना ही बातमी कळवण्यात आली. अस्तगावसह संपूर्ण मनमाड परिसरात ही घटना समजताच शोककळा पसरली.
 
 
 
मेजर सुरेश घुगे हे रात्री नऊ वाजता जम्मूमधील एका डोंगरावर गस्त घालत होते. यावेळी त्यांचा पाय घसरुन ते डोंगरावरून खाली कोसळले आणि त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच इतर जवानांनी त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल केले होते. परंतु वैद्यकिय उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आले. त्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू करण्यात आली असून उद्या दि.१२ डिसेंबर रोजी अस्तगाव येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
 
 
 
 
२००६ साली सुरेश घुगे हे भारतीय सेनेत दाखल झाले होते व ते जम्मू काश्मीरच्या नवसेरा सेक्टरमध्ये '२४ मराठा बटालियनमध्ये' कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि ९ वर्षाची मुलगी, दोन विवाहित बहिणी व भाऊ असा परिवार आहे.
 

 
@@AUTHORINFO_V1@@