'राजकुमार'ची गोरेवाडा व्याघ्र सफारीत एन्ट्री; लवकरच पर्यटकांना प्रवेश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2020
Total Views |
tiger safari _1 &nbs


येत्या काही दिवसात सफारीत वाघिणीला सोडणार 

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - नागपूर येथील 'गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालया'त बांधण्यात आलेल्या व्याघ्र सफारीत आज 'राजकुमार' या नर वाघाला सोडण्यात आले. टप्याटप्याने बिबट, अस्वल आणि तृणभक्षी प्राण्यांच्या सफारीमध्ये वन्यजीवांना सोडण्यात येईल. सफारीमध्ये हे प्राणी स्थिरस्थावर झाल्यानंतर पर्यटकांसाठी सफारीमधील प्रवेश खुला करण्यात येणार आहे.  
  
 
 
'केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणा'च्या परवानगीनुसार २० ते २६ नोव्हेंबर दरम्यान काही वन्यजीवांना गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात हलविण्यात आले होते. यामध्ये २ वाघ, ७ बिबट आणि ६ अस्वलांचा समावेश होता. या सर्व वन्यजीवांना मूळ सफारीत न सोडता नाईट शेल्टर आणि क्राॅल क्षेत्रात ठेवण्यात आले होते. आज सकाळी १० वाजता राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक, वनबल एन.रामबाबू आणि प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव नितीन काकोडकर, एफडीसीएम लि. चे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन आणि एफडीसीएम लि. नागपूरचे ऋषिकेश रंजन यांच्या उपस्थितीत राजकुमार नामक नर वाघाला मूळ सफारीमध्ये सोडण्यात आले. 
 

tiger_1  H x W: 
 
 
'गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालया'त वाघ, बिबट, अस्वल आणि तृणभक्षी प्राण्यांच्या सफारी तयार करण्यात आल्याची माहिती नितीन काकोडकर यांनी दिली. प्रत्येकी २५ हेक्टर क्षेत्रावर या सफारी पसरलेल्या आहेत. यामधील व्याघ्र सफारीत 'राजकुमार' या वाघाला सोडण्यात आले असून यापुढे 'ली' या वाघिणीला त्यामध्ये सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. टप्प्याटप्याने बिबट आणि अस्वलांना देखील त्यांच्याकरिता तयार करण्यात आलेल्या सफारीमध्ये मुक्त करण्यात येणार आहे. 
 
 
कोण आहे 'राजकुमार' ?


'राजकुमार' वाघाचा इतिहास अतिशय रंजक आहे. २०१७ मध्ये मध्य प्रदेशातील मासूलखापा गावातील लग्नाच्या मंडपात हा वाघ शिरला होता. मात्र, मुळातच शांत स्वभावाचा असल्याने त्याने कोणत्याही प्रकारचा धुमाकूळ या ठिकाणी घातला नव्हता. त्यानंतर साधारण १० डिसेंबर, २०१७ रोजी या वाघाने बावनथडी नदी ओलांडून महाराष्ट्रात प्रवेश केला. तेव्हापासून हा वाघ भंडारा जिल्ह्य़ातील तुमसर तालुक्यात वावरत होता. तसेच एका मजुराचा जेवणाचा डबादेखील या वाघाने पळविला होता. २२ डिसेंबर, २०१७ रोजी सीतासावंगीजवळील चिखला येथील झुडपांमध्ये बसला असताना वन विभागाने त्याला बंदिस्त केले. त्यानंतर त्याची रवानगी गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात करण्यात आली होती. 

 

  

@@AUTHORINFO_V1@@