अयोध्येतील राम मंदिर लोकवर्गणीतून उभे राहणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Dec-2020
Total Views |

VHS_1  H x W: 0
 

तीन वर्षांमध्ये श्री राम मंदिर निर्माणाचे काम पूर्ण होणार

मुंबई : अयोध्येत श्रीराम मंदिर उभे राहण्यात निश्चित कालावधी सांगता येत नसला तरी किमान तीन वर्षे तरी निश्चित लागतील, असे विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे सरचिटणीस चंपतराय यांनी सांगितले. मंदिराचा भूमिपूजन सोहळा झाला असला तरी अजून उभारणीला सुरुवात झाली नाही. मात्र त्या आधीच भक्तिभावाने लोक आर्थिक रूपाने आपला सहभाग नोंदवत आहेत. त्यात शिवसेनेकडून १ कोटी रुपयांचा निधी बँक खात्यात जमा असल्याचे चंपतराय यांनी सांगितले.
 
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या निर्मितीला सुरुवात होण्यापासून त्यासाठी जमा होणारा निधी, मंदिराची रचना आणि बांधकाम करणार्‍या कंपन्या याबाबत चंपतराय यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात शनिवारी, दि. १२ डिसेंबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी विश्वहिंदू परिषदेच्या कोकण प्रांताचे सरचिटणीस राजन नायर, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कार्यकर्ते विश्वेश्वर शंकराचार्यजी उपस्थित होते. चंपतरायजी म्हणाले की, राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचा आराखडा मोठा आहे. त्यानुसार सर्व तयारी झाली आहे. रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राची लांबी ३६५ फूट, रुंदी २३५ फूट, उंची १६१ फूट राहणार आहे. विश्वहिंदू परिषदेचे अशोक सिंघल काही वर्षांपूर्वी लार्सन आणि टुब्रोच्या अधिकार्‍यांना भेटले होते. त्यावेळी त्यांनी मंदिर बांधण्याचे वचन दिले होते. त्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे बांधकाम लार्सन टुब्रो करणार आहे. टाटा कन्सल्टन्सीचे इंजीनीयर सल्लागार आहेत. आयआयटी मुंबई, चेन्नई, गुवाहाटी, दिल्ली तेथील वालुकामय जागेचे परीक्षण करत आहेत. सोमनाथ मंदिराचा आराखडा तयार करणारे वास्तुरचनाकार चंद्रकांतभाई सोमपुरा हेच रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या वास्तुरचनेचा आराखडा तयार करत आहेत,” असे त्यांनी सांगितले.
 
ते पुढे म्हणाले की, “ऐतिहासिक अशा राममंदिर जन्मभूमीचा इतिहास सध्याच्या युवा पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी विश्वहिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशभर घराघरात पोहोचणार आहेत. राम जन्मभूमी मिळविण्यासाठी लाखो भाविकांनी कष्ट घेतले आहेत. त्याप्रमाणे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र उभारणीसाठी कोट्यवधी लोक निश्चितच स्वेच्छानिधी देतील, असा विश्वास चंपतरायजी यांनी व्यक्त केला. यावेळी कोणावरही सक्ती केली जाणार नाही. दहा रुपयांपासून ज्याच्या मनाला येईल ती रक्कम स्वीकारली जाईल. यात पारदर्शकता राहण्यासाठी निधी देणार्‍याला कूपन किंवा पावती देण्यात येईल तसेच रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे संकल्पचित्र देण्यात येईल. मकर संक्रांतीपासून माघ पौर्णिमेपर्यंत कार्यकर्ते त्यांच्या परिसरात स्वेच्छा निधी स्वीकारणार आहेत,” असे त्यांनी सांगितले.
 
स्वेच्छानिधीचा ओघ सुरू
 
मंदिराचे काम सुरू होण्याच्या आधीच स्वेच्छानिधीचा ओघ सुरू झाला आहे. शिवसेनेचे पक्षाध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे अयोध्येला आले होते. त्यावेळी त्यांनी मदतीची घोषणा केली होती. त्याप्रमाणे त्यांनी एक कोटी रुपये निधी ट्रस्टच्या खात्यात जमा केला आहे. मुरारी बापू यांच्या भक्तगणांनी ११ कोटी ५० लाख रुपयांचा निधी खात्यात जमा केला आहे. दररोज हजोरां खात्यातून ट्रस्टच्या खात्यात निधी जमा होत आहे, असे चंपतराय म्हणाले.
 
दगडांचा शोध सुरू
 
हे मंदिर सिंमेट क्राँक्रीटचे नसून दगडाचे बांधले जाणार आहे. त्यासाठी राजस्थानमधून ठराविक गुणवत्तेचे दगड आणले जाणार होते. मात्र राजस्थानमध्ये उत्खननाला बंदी आल्याने आता दगडाचा शोध सुरू आहे. मंदिरासाठी ३ लाख घटफूट दगड लागणार आहे, कदाचित त्यापेक्षाही जास्त लागू शकेल, असे चंपतराय यांनी सांगितले.
 
सरकारकडे निधीची मागणी नाही
 
रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रासाठी सरकारकडे निधी मागितला जाणार नाही. संपूर्ण मंदिर भाविकांच्या सहभागातून निर्माण होईल. सरकारचा निधी मंदिर बांधण्यासाठी नव्हे, तर लोकांना सुविधा देण्यासाठी असतो. सरकारने त्या पैशातून लोकांना सुविधा द्याव्यात. लोक मंदिरासाठी सद्भावनेने आणि स्वेच्छेने मदत देतील. त्यांच्या निधीतूनच मंदिर उभे राहील, असा विश्वास चंपतराय यांनी व्यक्त केला.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@