
नवी दिल्ली : नव्या सुधारित कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आंदोलन तीव्र होत चालले आहे. दिल्लीतील सीमेवर पंजाब आणि हरियाणाहून हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी सातशे ट्रॅक्टर-ट्रॉली आणि आंदोलक शेतकरी ५० हजार दिल्लीच्या सीमेवर धकडले आहेत. केंद्र सरकारवर दबाव टाकण्यासाठी आता रेल रोको आणि चक्का जाम आंदोलन केले जाणार असल्याची घोषणा शेतकरी नेत्यांनी केली होती.
आता त्याचीच पूर्वतयारी संघटना करत आहेत. दरम्यान, शेतकरी नेत्यांच्या गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या बैठकीत १५ मागण्या ठेवल्या होत्या. त्यापैकी १२ मागण्या मान्य करण्यासाठी केंद्र सरकारने तयारी दर्शवली आहे. त्यातच शेतकऱ्यांना नव्या कृषी सुधारणा विधेयकांमध्ये काही त्रुटी आहेत, असे वाटत आहे. त्यामुळे शेतकरी आंदोलनावर ठाम आहेत. या ५० हजार शेतकऱ्यांच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले किसान-मजदूर संघर्ष समिती प्रमुख सरवण सिंह पंधेर म्हणतात, पुढील सहा महिने पुरेल इतका शिधासाठा घेऊन आम्ही दिल्लीला जात आहोत. आमच्या संघर्षाला यश मिळेपर्यंत हा लढा कायम राहणार आहे.
जालंधरहून पुढे...
दुपार नंतर शेतकऱ्यांचा जत्था जालंधरला पोहोचला होता. जालंधर-अमृतसर महामार्गावर एका बाजूला ट्रॅक्टर आणि ट्रॉल्यांची रांग लागली होती. त्यामुळे दैनंदिन वाहतूकीला अडथळा निर्माण झाला होता. शेतकरी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी श्री हरमंदिर साहिब येथे अरदास केली आणि त्यानंतर गोल्डन गेट येथे एकत्र आले.
कृषी मंत्र्यांच्या आवाहनानंतरही फरक पडला नाही
१० सप्टेंबर रोजी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांनी आंदोलांन थांबवावे, असे आवाहन केले होते. आम्ही शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहोत, असा विश्वासही त्यांनी दिला होता. कोरोनाचे संकट आणि उत्तरेकडील थंडी या सर्व अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या परिस्थिती बाबत आम्ही चिंतीत आहोत. त्यांनी आम्ही दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करायटला हवी.
दिल्लीला घेरण्याची तयारी
दुसरीकडे कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीवर दिल्ली घेरण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. कृषि कायद्यांमध्ये सुधारणांचा प्रस्ताव सरकारने शेतकऱ्यांपुढे ठेवला आहे. मात्र, आपल्या मागण्यांवर ठाम राहत शेतकरी दिल्ली घेरण्याची तयारी करत आहेत. शेतकऱ्यांनी आगरा-दिल्ली रोड और जयपुर-दिल्ली रोड बंद करण्याची योजना आखली आहे. शेतकरी १२ डिसेंबर रोजी हे आंदोलन सुरू करणार आहेत.
कसे एकत्र आले शेतकरी
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात सामील होण्यासाठी शेतकऱ्यांचा जत्था अमृतसर, तरनतारन आणि गुरदासपुर आदी भागांत पोहोचला होता. ब्यास पूलावर हे सर्व शेतकरी एकत्र आले. फिरोझपूर, जालंधर, कपूरथला, मोगा आणि फाजिल्का जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा जत्था रवाना झाला. लुधियानाच्या दोराहा मंडीतून पोहोचून अमृतसरला पोहोचले होते. आता सर्व जण एकत्र दिल्लीकडे कूच करत आहेत.
पोलीस दलही सज्ज
जेव्हा शेतकऱ्यांनी दिल्ली जयपूर-दिल्ली मार्ग आणि आगरा-दिल्ली रोडवर चक्का जाम करण्याची घोषणा केली आहे. पोलीस आता परिस्थितीवर नियंत्रणात आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. प्रशासनाने संपूर्ण रस्त्यांवर आणि संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त उभारला आहे.